1 / 10भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा आपल्या कुटुंबीयांसह हैदराबाद येथे आहे. कोरोना व्हायरसमुळे देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. 2 / 10क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेतच, शिवाय खेळाडूंना घरीच रहावे लागत आहे. अशात सानियाला एक चिंता सतावत आहे. 3 / 10तिचा मुलगा इझानला त्याच्या बाबांचा म्हणजे शोएब मलिकचा चेहरा कधी पाहायला मिळेल, ही चिंता तिला सतावत आहे.4 / 10सानिया आणि शोएब दोन वेगवेगळ्या देशांत लॉकडाऊन झाले आहेत. 5 / 10पाकिस्तानचा क्रिकेटपटू मलिक त्याच्या आईसह पाकिस्तानातील सियालकोट येथे आहे. 6 / 10इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सानियानं ही चिंता व्यक्त केली. लॉकडाऊन जाहीर होण्यापूर्वी सानिया अमेरिकेत होती. त्यानंतर फेड कप प्ले ऑफमध्ये ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर सानिया इंडियान वेल्स टूर्नामेंटसाठी अमेरिकेला गेली होती. 7 / 10तिथे गेल्यावर ती स्पर्धा रद्द झाल्याचे तिला समजले. त्यानंतर ती भारतात परतली आणि त्याकाळात शोएब पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळत होता. 8 / 10सानिया म्हणाली,''शोएब मलिक पाकिस्तानमध्ये आहे आणि मी इथे. हा आमच्यासाठी कठीण प्रसंग आहे, कारण आमचा एक लहान मुलगा आहे. इझान त्याच्या बाबांना पुन्हा कधी बघू शकेल, हेही मला माहीत नाही. आम्ही दोघं सकारात्मक विचार करणारे आहोत. शोएब त्याच्या 65 वर्षीय आईसोबत सियालकोट येथे आहे आणि आता त्यांना शोएबची जास्त गरज आहे. आम्हाला जे योग्य वाटले, तेच आम्ही केलं. या संकटातून आपण लवकर बाहेर पडू, अशी मला आशा आहे.''9 / 10या काळात केवळ कुटुंबाचा विचार करत असल्याचे सानियानं सांगितले. ती म्हणाली,''मला अन्य गोष्टींची जास्त चिंता नसते. पण, काही दिवसांपूर्वी भविष्याचा विचार करून मी घाबरली होती. घरी लहान मुलगा आणि म्हातारे आई-वडिल असताना आपण त्यांच्याबद्दलच विचार करतो. काम आणि टेनिस याचा विचारही डोक्यात येत नाही.''10 / 10या काळात केवळ कुटुंबाचा विचार करत असल्याचे सानियानं सांगितले. ती म्हणाली,''मला अन्य गोष्टींची जास्त चिंता नसते. पण, काही दिवसांपूर्वी भविष्याचा विचार करून मी घाबरली होती. घरी लहान मुलगा आणि म्हातारे आई-वडिल असताना आपण त्यांच्याबद्दलच विचार करतो. काम आणि टेनिस याचा विचारही डोक्यात येत नाही.''