Corona Virus : 21 वर्षीय टेनिसपटूची समाजसेवा; गरजूंना वाटतेय जीवनावश्यक वस्तू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2020 14:18 IST
1 / 10कोरोना व्हायरसमुळे जगभरातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे हातावर पोट असलेल्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा गरजूंसाठी अनेक क्रीडापटू, सेलिब्रेटी धावून येताना पाहायला मिळत आहेत.2 / 10ब्रिस्टॉल येथील 21 वर्षीय टेनिसपटून कॅटी स्वान हीनंही पुढाकार घेऊन गरजूंना जीवनावश्यक वस्तू पुरवत आहे. कनास येथील विचिटा येथील 70 कुटुंबीयांचे ती आणि तिची आई निकी पोट भरत आहेत.3 / 10कॅटी आणि तिच्या आईनं त्यांच्या घरातील गॅरेजचं सुपरमार्केटमध्ये रुपांतर केले आहे आणि त्यात त्यांनी खाण्याचं पॅकेज ठेवले आहेत. दररोज त्या दोघी गरजूंना हे अन्न पुरवत आहेत.4 / 10ब्रिटनच्या या खेळाडूनं फेड चषक टेनिस स्पर्धेत संघाला यश मिळवून दिले आहे. त्यामुळे तिला फेड कप स्टार असे संबोंधले जाते.5 / 10ती म्हणाली,''माझी आई 'Big Brother Big Sisters' या चॅरीटीसाठी काम करते. ही चॅरीटी गरीब विद्यार्थी किंवा आर्थिक दुर्लब कुटुंबांना सहकार्य करण्याचं काम करते.''6 / 10कॅटी या समाजकार्यात आता आईच्या मदतीला पुढे आली आहे. तिनं फेसबूकवरून निधी जमा करण्याचं आवाहन केलं आहे.7 / 10फेसबुकवर तिनं केलेल्या आव्हानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत तिनं 4 हजार डॉलर इतका निधी गोळा केला आहे.8 / 10''माझा भाऊ आणि मी जेवणाचे पॅकेज गरजू लोकांपर्यंत पोहचवतो. माझ्या भावाच्या शाळेतील काही मुलंही आम्हाला मदत करतात,'' असे कॅटीनं सांगितले.9 / 10कॅटी ही जागतिक क्रमवारीत 256 व्या स्थानावर आहे. 10 / 10तिच्या या समाजकार्याचे ब्रिटनमध्ये कौतुक होत आहे.