By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2021 17:13 IST
1 / 11टेनिस सम्राट रॉजर फेडरर यानं टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय नुकताच घेतला. गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्यानं ही माघार घेतली. पण, टेनिस कोर्टपासून दूर असलेल्या फेडररनं समाजकार्य करण्यासाठी पुन्हा एकदा पुढाकार घेतला आहे. 2 / 11स्वित्झर्लंडच्या महान टेनिसपटूनं त्याच्या कारकिर्दीत वापरलेले रॅकेट्स, शूज, टी-शर्ट या व्यतिरिक्त अनेक मौल्यवान वस्तूंचा लिलाव केला आहे. 3 / 11या लिलावातून आतापर्यंत ३५ कोटींचा निधी गोळा करण्यात आला असून तो रॉजर फेडरर फाऊंडेशनला देण्यात येणार आहे. ही संस्थान स्वित्झर्लंड आणि आफ्रिकेतील देशांमध्ये शिक्षण क्षेत्रासाठी काम करते. 4 / 11२० ग्रँडस्लॅम जेतेपद नावावर असलेल्या फेडररनं Christies Auction Houseच्या माध्यमातून दोन भागांत ही लिलाव प्रक्रिया पार पडली. 5 / 11२३ जूनला झालेल्या पहिल्या भागात फेडररच्या ग्रँडस्लॅम कारकिर्दीशी संबंधित वस्तूंचा लिलाव झाला. यात फेडररच्या विम्बल्डन, फ्रेंच ओपन, ऑस्ट्रेलियन आणि अमेरिकन ओपन स्पर्धेतील शूज, टी-शर्ट आणि रॅकेट यांचा समावेश आहे.6 / 11१४ जुलैला दुसरी लिलाव प्रक्रिया पार पडली. यात फेडररच्या २१ वर्षांच्या कारकिर्दीतील अनेक मौल्यवान वस्तूंचा लिलाव झाला. यात त्यानं खेळलेल्या पहिल्या ऑलिम्पिकमधील वस्तूंचाही समावेश होता. फेडरर १९ वर्षांचा असताना २०००मध्ये सिडनी ऑलिम्पिकमध्ये खेळला होता.7 / 11 २०१९च्या विम्बल्डन स्पर्धेत वापरण्यात आलेली तीन रॅकेट्स १.६७ कोटींती विकली गेली. ठरलेल्या रक्कमेपेक्षा ती २३ टक्क्यांनी अधिक आहे. 8 / 11 २०१९च्या विम्बल्डन स्पर्धेत वापरण्यात आलेली तीन रॅकेट्स १.६७ कोटींती विकली गेली. ठरलेल्या रक्कमेपेक्षा ती २३ टक्क्यांनी अधिक आहे. 9 / 11 २०१९च्या विम्बल्डन स्पर्धेत वापरण्यात आलेली तीन रॅकेट्स १.६७ कोटींती विकली गेली. ठरलेल्या रक्कमेपेक्षा ती २३ टक्क्यांनी अधिक आहे. 10 / 11 २०१९च्या विम्बल्डन स्पर्धेत वापरण्यात आलेली तीन रॅकेट्स १.६७ कोटींती विकली गेली. ठरलेल्या रक्कमेपेक्षा ती २३ टक्क्यांनी अधिक आहे. 11 / 11 २०१९च्या विम्बल्डन स्पर्धेत वापरण्यात आलेली तीन रॅकेट्स १.६७ कोटींती विकली गेली. ठरलेल्या रक्कमेपेक्षा ती २३ टक्क्यांनी अधिक आहे.