Sania Mirza becomes first Indian to be nominated for Fed Cup Heart award svg
Sania Mirza ला मिळाली आनंदाची बातमी; म्हणाली, हा क्षण माझ्यासाठी खास! By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2020 11:03 AM1 / 7भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झासाठी गुरुवारचा दिवस खास बनला. 2003पासून भारतीय टेनिस विश्वास आपला दबदबा निर्माण करणाऱ्या सानियाला फेड चषक हार्ट पुरस्कारासाठी (Fed Cup Heart Award) नामांकन मिळालं आहे. 2 / 7पुरस्कारासाठी नामांकित झालेली सानिया ही पहिलीच भारतीय खेळाडू ठरली आहे. सानियानं आशिया/ओशियानिक विभागातून इंडोनिशियाच्या प्रिस्का मेडेलिन नुग्रोहो हिच्यासह सानियाला नामांकन देण्यात आले आहे.3 / 7सानियानं नुकतीच चार वर्षांनंतर फेड चषक स्पर्धेत पुनरागमन केले होते. या सामना खेळताना प्रेक्षकांमध्ये तिचा 18 महिन्यांचा मुलगा इजहानही उपस्थित होता. 4 / 7भारताला सर्वात प्रथम फेड चषक स्पर्धेच्या प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळवून देण्यात सानियानं महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. 5 / 7अखित भारतीय टेनिस महासंघाच्या प्रेस रिलीजमध्ये सानियानं म्हटलं की,''2003मध्ये मी पहिल्यांदा टीम इंडियाच्या जर्सीत कोर्टवर उतरली होती आणि तो दिवस माझ्यासाठी गौरवशाली होता. आतापर्यंत 18 वर्षांचा प्रवास झाला आहे.''6 / 7ती पुढे म्हणाली,''फेड चषकमध्ये आशिया/ओशियाना स्पर्धेतील मिळवलेला विजय हा आयुष्यातील सर्वात मोठं यशापैकी एक आहे. मला फेड कप हार्ट पुरस्कारासाठी नामांकन दिल्याबद्दल आभारी. हा क्षण माझ्यासाठी खास आहे.''7 / 7तीन विभागातून सहा खेळाडूंना या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहेत. युरोप/आफ्रिका विभागातून अॅनेट्ट कोंटावेट ( इस्टोनिया) आणि एलेओनोरा मोलिनारो ( लक्सेमबर्ग); अमेरिकन विभागातून पॅराग्वेच्या व्हेरोनिका केपेडे रॉय, मेस्किकोच्या फर्नांडा कोट्रेरास गोमेज यांनाही नामांकन मिळाले आहेत. विजेता निवडण्यासाठी 1 ते 8 मे या कालावधीत मतदान करावं लागणार आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications