लग्न बहिणीचं अन् लक्ष वेधलं करवलीनं... पाहा सानिया मिर्झाचे खास फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2019 17:39 IST
1 / 10सानिया आणि शोएब हे दाम्पत्य नेहमी चर्चेत राहिले आहे. आता सानियाची बहीण अनम मिर्झानेही क्रिकेटपटूच्या मुलाशी लग्न केले आहे.2 / 10भारतीय संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनचा मुलगा असद आणि अनम यांच्यात प्रेमसंबंध आहेत अन् नुकतेच त्यांनी विवाह केला.3 / 10असद आणि अनम यांना अनेकदा सार्वजनिक ठिकाणी एकत्र पाहिले गेले होते आणि मोठ्या थाटामाटात त्यांचा विवाह झाला.4 / 10असद-अनमच्या लग्नाला अनेक सेलिब्रेटींची उपस्थिती होती, परंतु करवली असलेल्या सानियानं सर्वांचे लक्ष वेधलं.5 / 10मेहंदी, लग्न सोहळा आणि रिसेप्शनमध्ये परिधान केलेल्या पारंपरिक ड्रेसमध्ये सानियाचं सौंदर्य अजून खुलून दिसत होतं. त्यामुळे वधुवरापेक्षा सानियाच्याच सौंदर्याची चर्चा रंगलेली पाहायला मिळाली.6 / 10सानियानं यावेळी मुलगा इझानसहही काही फोटो काढले आणि तेही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले.7 / 10सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांची प्रेमकथा ही एखाद्या बॉलिवूड चित्रपटासारखीच आहे. सानिया ही भारताची टेनिस स्टार, तर शोएब पाकिस्तान क्रिकेट संघातील प्रमुख फलंदाज...8 / 10India Today ला दिलेल्या मुलाखतीत सानियानं शोएबसोबतच्या पहिल्या भेटीचा प्रसंग सांगितला. सानियाला आतापर्यंत तिचं आणि शोएबचं लग्न हा योगच असल्याचं वाटतं होतं. पण, तो योगायोग नव्हता.9 / 10सानियानं सांगितलं,''तो एक क्रिकेटपटू अन् मी टेनिसपटू, एवढंच काहीते आम्ही एकमेकांना ओळखत होतो. पण, आमची पहिली भेट होबार्टच्या एका रेस्टॉरंटमध्ये झाली. सायंकाळचे 6 वाजले असतील आणि त्यावेळी आम्हा दोघांशिवाय तेथे चिटपाखरूही नव्हतं.''10 / 10''आमची ती भेट ही नियतीनंच ठरवली होती, असं मला वाटत होतं. पण, नंतर मला समजलं की मी तेथे होते म्हणून शोएब ठरवून मला भेटण्यासाठी आला होता. मी आतापर्यंत नियतिचे आभार मानत होते,'' असं तिनं सांगितलं.