शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

IPL विजेत्यापेक्षाही जास्त कमावले २० वर्षीय कार्लोस अलकराझने; Wimbledon जिंकून झाला अब्जाधीश

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 9:50 AM

1 / 6
कार्लोस अलकराझसाठी नोव्हाक जोकोव्हिचला हरवणे सोपे नव्हते. अलकराझने पाच सेटच्या लढतीत जोकोव्हिचचा १-६, ७-६ (८-६), ६-१, ३-६, ६-४ असा पाच सेटमध्ये आणि सुमारे पाच तास चाललेल्या सामन्यात पराभव केला.
2 / 6
विम्बल्डन जिंकणारा तो तिसरा स्पॅनिश खेळाडू ठरला. राफेल नदालने २००८ व २०१० मध्ये तर मॅन्यूएल सँटानाने १९६६ मध्ये विम्बल्डन जिंकली होती.
3 / 6
विम्बल्डनमध्ये चॅम्पियन बनताच अलकराझवर पैशांचा पाऊस पडला. २० वर्षीय अलकराजला विम्बल्डन जिंकल्यानंतर २३ लाख ५० हजार पौंडची बक्षीस रक्कम मिळाली. भारतीय रुपयांमध्ये ही किंमत सुमारे २५ कोटी आहे.
4 / 6
आयपीएल २०२३ च्या चॅम्पियन टीम चेन्नई सुपर किंग्सला कार्लोस अलकराझपेक्षा कमी बक्षीस रक्कम मिळाली आहे. CSK ला २० कोटींची रक्कम मिळाली, तर संपूर्ण IPL स्पर्धेसाठी बक्षीस रकमेचे एकूण बजेट फक्त ४७ कोटी होते. त्याच वेळी, विम्बल्डनमधील एकूण बक्षीस रक्कम ४७ लाख पौंड म्हणजेच ४६५ कोटी रुपयांमध्ये वितरित करण्यात आली आहे.
5 / 6
फोर्ब्स मासिकाच्या अहवालानुसार अलकराजची एकूण संपत्ती १००कोटींहून अधिक आहे. अलकराझचा मुख्य उत्पन्नाचा स्रोत टेनिस स्पर्धेतील बक्षीस रक्कम आहे. याशिवाय तो अनेक मोठ्या आणि लक्झरी ब्रँडसाठी एंडोर्समेंटही करतो.
6 / 6
Alcaraz प्रसिद्ध शू ब्रँड Nike शी संबंधित आहे. याशिवाय, रोलेक्स, बीएमडब्ल्यू, केल्विन क्लेन आणि लुई व्हिटॉन सारख्या लक्झरी ब्रँड्सशी त्याचे एंडोर्समेंट डील आहेत, ज्यामुळे त्याला करोडोची कमाई होते. ज्युनियर टेनिसच्या काळातही तो प्रसिद्ध इटालियन शू कंपनी लोट्टोशी संबंधित होता.
टॅग्स :Wimbledonविम्बल्डनIPLआयपीएल २०२३