Actor Praveen Tarde likes 'Ambernath Pattern', Cylinder Man promises chance in film
अभिनेता प्रवीण तरडेंना आवडला 'अंबरनाथ पॅटर्न', सिलेंडर मॅनला चित्रपटात संधीचं आश्वासन By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2021 12:50 PM1 / 12 अंबरनाथच्या एका पिळदार शरीरयष्टी असलेल्या सिलेंडर मॅनचे फोटो गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. सागर जाधव असे या सिलेंडर मॅनचे नाव आहे. 2 / 12सिलेंडर डिलिव्हरी करणारा सागर हा आता रातोरात स्टार झालाय. त्यामुळे अंबरनाथमध्ये सागरचे मोठे कौतुक होत आहे. विशेष म्हणजे व्हायरल पोस्टमुळे सागरचं नशिबच पालटलंय. 3 / 12दिग्दर्शक अभिनेता प्रवीण तरडे यांनी सागरला आपल्या चित्रपटात संधी देण्याचं आश्वासन दिलंय. यासंदर्भात सागरचा फोटो व्हायरल करणाऱ्या तुषार भामरे यांनी माहिती दिली आहे. 4 / 12३० किलोचा सिलेंडर उचलायचा, मग आपण ४५ किलोचे असून कसं चालेल? हे वाक्य आहे अंबरनाथचा सिलेंडर मॅन सागर जाधव याचे. 5 / 12याच जिद्दीतून सागरने गेल्या २-३ वर्षात मेहनत करून अतिशय पिळदार शरीरयष्टी कमावली आहे. त्यामुळे खांद्यावर सिलेंडर घेतलेला सागर हा जणू बाहुबलीच भासू लागला. 6 / 12सागर हा अंबरनाथच्या भारत गॅसची एजन्सी असलेल्या राणू गॅस कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत असून गेल्या 10 वर्षांपासून तो गॅस सिलेंडर वाहण्याचं काम करत आहे. 7 / 12सागर अंबरनाथ स्टेशन परिसरात सिलेंडरच्या गाडीजवळ उभा असताना अंबरनाथच्याच तुषार भामरे या तरुणाने त्याची पर्सनॅलिटी पाहून त्याचे फोटो काढले आणि सागरच्या नकळत फेसबुकवर टाकले. 8 / 12अगदी सहज म्हणून हे फोटो तुषारने फेसबुकवर टाकले आणि हे फोटो तुफान व्हायरल झाले. अगदी वेबसिरीजच्या कास्टिंग डायरेक्टर्स पासून ते निर्मात्यांपर्यंत सगळ्यांनीच सागरच्या या पर्सनॅलिटीचं कौतुक केले. 9 / 12सागर जाधव हा मूळचा नाशिक जिल्ह्यातला. १२ वी पर्यंत शिकलेल्या सागरचे बालपण आणि शिक्षण नाशिक जिल्ह्यातच झाले. आई वडिलांचे छत्र हरपलेल्या सागरने अंबरनाथ गाठले. 10 / 12१२ वी नंतर अंबरनाथला काका काकूंकडे येऊन नोकरीचा शोध सुरू केला. तो राहत असलेल्या लक्ष्मीनगर परिसरातच भारत गॅसचं गोडाऊन आहे. याचठिकाणी १२ वर्षांपासून सागर नोकरी करतोय. 11 / 12सागरच्या घरी त्याचे काका-काकू, भाऊ आणि पत्नी असा परिवार आहे. अतिशय मेहनत करून, ४-४ मजले सिलेंडर खांद्यावर घेऊन चढून सागर त्याचे घर चालवतो. 12 / 12पण आयुष्य एका रेषेत चालले असताना अचानक असे काही तरी होईल, आणि आयुष्य रातोरात इतके बदलेल, असं स्वप्नातही वाटले नव्हते, असे सागर नम्रपणे सांगतो. आणखी वाचा Subscribe to Notifications