CM Eknath Shinde celebration in Thane cute grandson welcomes grandfather
CM Eknath Shinde: CM शिंदेंचं ठाण्यात जंगी सेलिब्रेशन, गोंडस नातू स्वागताला; आजोबा-नातवाच्या प्रेमाचं ट्युनिंग! By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2022 9:12 AM1 / 12एक कट्टर शिवसैनिक आणि लोकांमध्ये रमणारा नेता अशी ओळख असलेले एकनाथ शिंदे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर काल ठाण्यात परतले. यावेळी एकनाथ शिंदेंचं जंगी स्वागत करण्यात आलं. ठाण्यात शिंदेंच्या राहत्या घरी स्वागतावेळी दारात नातवाला पाहताच मुख्यमंत्री शिंदेंच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणीत झाला. 2 / 12ठाण्यात काल पावसाची रिपरिप सुरू असतानाही ठिकठिकाणी ढोल ताशे आणि फुलांच्या वर्षावात एकनाथ शिंदेंची विजयी मिरवणूक काढण्यात आली. 3 / 12तब्बल १५ दिवसांनी ठाण्यात आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी शक्ती स्थळावर जोरदार शक्तिप्रदर्शन केले.4 / 12ठाण्याचे प्रवेशद्वार असलेल्या आनंद नगर चेक नाक्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जंगी स्वागत झाल्यानंतर आपल्या ५० समर्थक आमदारांसह ते थेट आनंद दिघे यांच्या शक्ती स्थळावर दाखल झाले. 5 / 12स्वर्गीय आनंद दिघे यांना अभिवादन करून हे सरकार हिंदुत्तवाचा विचार पुढे नेऊन सर्वसामान्य घटकांना न्याय देण्याचे कामकरेल असा विश्वास त्यांनी यावेळी पुन्हा एकदा व्यक्त केला. 6 / 12एकनाथ लोकनाथ या गाण्याचा गजर यावेळी करण्यात आला. जय भवानी जय शिवाजी, एकनाथ शिंदे आगे बढो अशा घोषणा दिल्या. बहुमत आमच्याकडे आहे. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने राज्यात युतीचे सरकार स्थापन झाले आहे. यापुढील वाटचाल बाळासाहेबांचे हिंदुत्व आणि त्यांचे विचार आणि विकासाचचे हिंदुत्व त्यानुसार राज्य सरकार या राज्याचा विकास करेल असा विश्वास त्यानी व्यक्त केला.7 / 12एकनाथ शिंदे यांचा नातू रुद्रांशनं यावेळी आपल्या मुख्यमंत्री आजोबांना विजयी तिलक लावत त्यांचं स्वागत केलं. 8 / 12सर्वसामान्य घटकांचा, शोषित,वंचित, पीडित अशा सर्व घटकांना न्याय देण्याचे काम सरकार करेल. शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र आमचं सरकार करेल, अनेक प्रकल्प आमचे सरकार करेल, राज्याचा विकास करण्यासाठी आमचं सरकार कटीबद्ध आहे.9 / 12नातू रुद्रांशला पाहिल्यानंतर एक वेगळाच आनंद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येत होता. नातू आणि आजोबाच्या नात्याचं ट्युनिंग किती लोभस असतं याचं दर्शन यावेळी झालं.10 / 12आजोबा आणि नातवाचं प्रेमाचं नातं पाहून उपस्थितही भारावले.11 / 12ठाण्यात लुईसवाडी, वागळे इस्टेट इथं शिंदे समर्थकांची तुफान गर्दी जमली होती.12 / 12समर्थकांना अभिवादन करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणखी वाचा Subscribe to Notifications