शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

भाईंदरमध्ये करवाढी विरोधात काँग्रेस - मनसेचे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2018 10:21 PM

1 / 5
भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेतील भाजपा सत्ताधा-यांनी बहुमताच्या जोरावर करवाढ करुन सामान्य नागरीकांना वेठीस धरल्याचा आरोप करीत काँग्रेस व मनसेने पालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर मंगळवारी करवाढीविरोधात तीव्र आंदोलन छेडले.
2 / 5
भाडेतत्वावरील मालमत्ता करांत कपात करुन व्यावसायिकांना झुकते माप दिले. भाजपाच्या या दुजाभावामुळे नागरीकांवर दरवर्षी वाढीव कराच्या माध्यमातून सुमारे १ ते दिड हजार रुपयांचा आर्थिक बोजा पडणार आहे.
3 / 5
सरकारी अनुदानात मिळालेले शेकडो कोटींचे सरकारी अनुदान विकासकामांसाठी मिळालेले असताना ते गेले कुठे, असा आरोप करीत काँग्रेस व मनसेने काळ्या फिती लावून करवाढीविरोधात पालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर तीव्र आंदोलन छेडले.
4 / 5
यावेळी सत्ताधारी भाजपाविरोधात आंदोलकांनी घोषणाबाजी केली.
5 / 5
आंदोलनात काँग्रेसच्या माजी उपमहापौर नूरजहाँ हुसेन, जिल्हाध्यक्ष अनिल सावंत, महिला जिल्हाध्यक्ष लीला पाटील, गटनेता जुबेर इनामदार, नगरसेवक राजीव मेहरा, अश्रफ शेख, माजी नगरसेविका सुनिता पाटील, युवा जिल्हा उपाध्यक्ष राकेश राजपुरोहित यांच्यासह आदी पदाधिकारी व कार्यर्त्यांनी सहभाग घेतला.
टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर