Demand Draft movement of Shiv Sena Deputy District
शिवसेना उपजिल्हाप्रमुखाचे बेमुदत धरणे आंदोलन By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2017 4:32 PM1 / 5भार्इंदर महापालिकेत एकाच पदावर वर्षानुवर्षे ठाण मांडणाऱ्या अधिकाऱ्यांची त्वरित इतरत्र बदली करण्याच्या मागणीसाठी ठाणे उपजिल्हाप्रमुख शंकर विरकर यांनी शुक्रवारपासून बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात केली. 2 / 5आंदोलनात सेनेचे नगरसेवक, नगरसेविकांसह पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदविला.3 / 5आंदोलनाची सुरुवात पालिका मुख्यालयातील शिवाजी महाराज व बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.4 / 5काही मल्लांनी मारुतीच्या मुखवट्यात आंदोलनाला सबळ आशीर्वाद दिल्यानंतर मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ आंदोलन सुरू करण्यात आले. 5 / 5जोपर्यंत ठोस कार्यवाही केली जाणार नाही, तोपर्यंत माघार घेणार नसल्याचे विरकर यांनी सांगितले. आणखी वाचा Subscribe to Notifications