Mira-Bhyander's dry washed classification project will start soon
मीरा-भाईंदरमध्ये सुक्या कचऱ्याच्या वर्गीकरणाचा प्रकल्प लवकरच होणार सुरू By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2018 8:17 PM1 / 5मीरा-भार्इंदर महापालिका हद्दीतील कचऱ्याचे सरकारी आदेशानुसार ओला व सुका असे वर्गीकरण करण्याची कार्यवाही प्रशासनाने काही महिन्यांपासून सुरू केली आहे.2 / 5मात्र वर्गीकरण झालेल्या कचऱ्यावर प्रक्रियाच होत नसल्याचा आरोप प्रशासनावर होत आहे. 3 / 5प्रशासनानं सुक्या कचऱ्याच्या वर्गीकरणाचा प्रकल्प जानेवारीच्या अखेरीस सुरू करण्याचा ठरविले आहे.4 / 5तर ओला कचऱ्यावरील प्रक्रियेसाठी तांत्रिक अडचणीमुळे एप्रिल महिना उजाडणार असल्याची माहिती आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी खास लोकमतला दिली.5 / 5पालिका हद्दीत दिवसाकाठी सुमारे ४०० ते ५०० मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. हा कचरा उत्तन येथील धावगी-डोंगर घनकचरा प्रकल्पात टाकला जातो. आणखी वाचा Subscribe to Notifications