By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2017 21:54 IST
1 / 5मीरा-भार्इंदर महापालिकेमार्फत गांधी जयंतीच्या निमित्ताने सोमवारी शहरात स्वच्छता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. 2 / 5पालिकेने स्वच्छतेसाठी निश्चित केलेल्या तारांकित मानांकनानुसार एकूण ४१ गृहनिर्माण संस्थांसह १५ शाळांची निवड करण्यात आली.3 / 5रॅलीला पालिकेच्या सहा प्रभागांतर्गत सुरुवात करण्यात आली. त्यात नागरिकांसह विविध संघटनांचे पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक, महिला बचतगटाचे सदस्य, शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी व शिक्षकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.4 / 5रॅलीद्वारे स्वच्छतेचा संदेश देण्यात येऊन ओला व सुका कच-याचे वर्गीकरण करण्यासह ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या न वापरण्याचे तसेच उघड्यावर शौचाला न बसणे व परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले.5 / 5विद्यार्थ्यांनी दर आठवड्यातून २ तास तर वर्षभरात १०० तास श्रमदान करण्याचा संकल्प केला.