डोंबिवलीत स्कूल व्हॅनच्या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2018 20:56 IST
1 / 5डोंबिवलीतील जय मल्हार शालेय विद्यार्थी वाहक सामाजिक संस्थेच्या वतीने आज सकाळी वाहतूक सुरक्षा सप्ताह अभियानानिमित्त भव्य स्कूल व्हॅन रॅली काढण्यात आली.2 / 5या रॅलीत ५० स्कूल बस सहभागी झाल्या होत्या. वाहतूक नियमांचे पालन करण्याचा संदेश रॅलीतून देण्यात आला.3 / 5संस्थेच्या तिस-या वर्धापन दिनानिमित्त रॅलीचे आयोजन केले होते. निवासी विभागातील ज्येष्ठ निरूपणकार स्व. नानासाहेब धर्माधिकारी रोडला असलेल्या महावितरण कार्यालयाजवळून या रॅलीला प्रारंभ झाला. 4 / 5प्रदूषण हा एकविसाव्या शतकातील अपराध आहे. हे पटवून देण्यासाठी विद्यार्थ्यांच्या हाती लक्षवेधी फलक देण्यात आले होते. 5 / 5या रॅलीत डोंबिवलीचे माजी शहरप्रमुख, नाशिकचे सह संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, डोंबिवली शहर वाहतूक नियंत्रण उपशाखेचे पोलीस निरीक्षक गोविंदराव गंभीरे, संस्थेचे अध्यक्ष सुदाम जाधव यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले होते.