Thane Thane, Kalyan-Dombivali river drains tumbled, claims of municipal corporation false?
ठाण्यासह कल्याण-डोंबिवलीत नाले तुंबलेलेच, महापालिकांचा दावा खोटा? By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2019 12:23 AM1 / 6जीवाची काहिली करणाऱ्या उन्हापासून सुटका होण्याचे दिवस जवळ आलेत. पावसाळा लवकरच सुरू होणार असून, त्याअनुषंगाने महापालिकांनी नालेसफाईची कामे युद्धपातळीवर सुरू केली आहेत. 2 / 6बऱ्याच भागांत ही कामे पूर्ण झाल्याचा दावा महापालिकांकडून केला जातो. त्या पार्श्वभूमीवर आमचे छायाचित्रकार आनंद मोरे, रोशन घाडगे, महेश मोरे यांनी ठाण्यासह कल्याण, डोंबिवलीचा आढावा घेतला. 3 / 6 नाल्यांची भीषण अवस्था दृष्टीस पडली. कल्याणमधील विठ्ठलवाडी परिसर, बसस्थानक आणि जरीमरी परिसर, 4 / 6डोंबिवलीतील गांधीनगर आणि एमआयडीसी मिलापनगर तसेच ठाण्यातील कामगार हॉस्पिटलनाका, कोरम मॉल, खोपट बसस्थानक, वृंदावन सोसायटीसह मुंब्रा-कौसा येथील गुलाब पार्क, मार्केट परिसरातील नालाही तुंबलेला आढळला. 5 / 6 या नाल्यांच्या दुर्गंधीमुळे परिसरातील रहिवाशांचे जगणे असह्य झाले असून, त्यांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे.6 / 6 या नाल्यांच्या दुर्गंधीमुळे परिसरातील रहिवाशांचे जगणे असह्य झाले असून, त्यांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications