10 biggest hindu temple in world
जगातली 10 सर्वात मोठी हिंदू मंदिरे By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2018 5:46 PM1 / 10कंबोडिया येथील अंगकोरवाट मंदिर हिंदू धर्मियांचं हे एक मोठं धार्मिक स्थळ आहे. या मंदिराला 12व्या शतकात राजा सुर्यवर्मन दूसरे यांनी बनविलं होतं. हे मंदिर मुख्यत: भगवान विष्णु यांना समर्पित करण्यात आलं आहे. मात्र, या ठिकाणी बौद्ध धर्माचाही प्रभाव पहायला मिळतो. एकूण 8,20,000 स्क्वेअर मीटर परिसरात बनविण्यात आलेल्या या मंदिराला युनेस्कोनेही जतन केलं आहे. 2 / 10तामिळनाडू येथे असलेलं श्री रंगनाथस्वामी मंदिर हे भारतातील सर्वात मोठं मंदिर आहे. एकूण 6,31,000 स्केअर मीटर परिसरात बांधण्यात आलेलं, हे मंदिर भगवान विष्णु यांना समर्पित करण्यात आलं आहे. या मंदिरात एक प्रकारचं शहरच वसल्याचं पहायला मिळतं. या ठिकाणी छोटे-मोठे एकूण 49 धार्मिक स्थळ आहेत. ज्यामुळे मंदिराचा प्रत्येक कोपरा हा भक्तांनी भरलेला पहायला मिळतो.3 / 10आधुनिक काळात बनविलेल्या या मंदिरांमध्ये दिल्लीचं अक्षरधाम (स्वामीनारायण) मंदिर खूपच आकर्षक आणि खास आहे. या मंदिराला एकूण 2,40,000 स्वेअर मीटर क्षेत्रफळात बनवलं गेलं आहे. हे मंदिर पाहण्यासाठी देश-विदेशातील नागरिक, पर्यटक दिल्लीला येत असतात.4 / 10भगवान शंकराला समर्पित करण्यात आलेलं थिल्लई नटराजा मंदिर तामिळनाडूतील चिदंबरम शहराचं एक आकर्षण आहे. या मंदिराला चिदंबरम मंदिर असे म्हटलं जातं. या मंदिरात शंकरासोबतच सिवाकामी अम्मन, गणपती, मुरुगन आणि गोविंदराजा पेरुमल यांचीही आराधना केली जाते. हे मंदिर 1,60,000 स्वेअर मीटर क्षेत्रफळात बांधण्यात आलं आहे.5 / 10महान हिंदू धार्मिक प्रचारक स्वामी विवेकानंद यांच्याद्वारे कोलकाता येथील हुगली नदीच्या किना-यावर बेलूर मठाची स्थापना करण्यात आली. 1,60,000 वर्ग मीटर परिसरात बांधण्यात आलेल्या या मंदिरात आद्यकालीची पूजा केली जाते. या ठिकाणी रामकृष्ण मिशनचं मुख्यालयंही आहे.6 / 10युनेस्कोने आपल्या यादीत समावेश केलेलं बृहदेश्वर मंदिर हे जगातील एक आश्चर्य मानलं जातं. तामिळानाडूतील तंजावरमधील या मंदिराच्या सर्वात मोठ् स्तंभाची उंची 200 फूट आहे आणि ही उंची सध्याच्या काळातील मानव निर्मित असलेली सर्वात उंच ठरली आहे. मंदिरातील शिवलिंगाची उंची 12 फूट आहे त्यासोबतच मंदिराच्या परिसरात बनविण्यात आलेली नंदीची प्रतिमा जवळपास 25 टन वजनाची आहे. ही प्रतिमा 12 फूट उंच आणि 20 फूट लांब आहे. या मंदिराची निर्मिती चोल राजांनी इ.स.वि.स.न. पूर्व 1010 मध्ये केली आहे.7 / 10आपल्या आगळ्या-वेगळ्या शिल्पकारी आणि उंच स्तंभांमुळे प्रसिद्ध अन्नामलाईयर मंदिर हे भगवान शिव यांना समर्पित आहे. हे मंदिर तामिळनाडूमधील तिरुनन्नामलाई येथे बांधण्यात आलं आहे. एकूण 1,01,171 वर्ग मीटर परिसरात या मंदिराचं निर्माण केलं आहे.8 / 10कांचीपूरम येथील एकम्बरेस्वरर मंदिर दक्षिण भारतातील पाच महाशिवमंदिरांपैकी एक आहे. असे मानलं जात की, हे मंदिर पृथ्वीचं प्रतिनिधित्व करतं. भगवान शिव यांना समर्पित करण्यात आलेलं हे मंदिर जवळपास 92,860 वर्गमीटर परिसरात बांधण्यात आलं आहे.9 / 10तामिळनाडूमधील त्रिची येथील थिरुवनेयीकवल मंदिर भगवान शिव यांना समर्पित करण्यात आलं आहे. या मंदिराची निर्मिती 1800 वर्षांपूर्वी चोल राजा कोसन्गंनन यांनी केली होती. जवळपास 72,843 वर्ग मीटर परिसरात बांधण्यात आलेल्या या मंदिरात अद्भुत कारीगिरी आणि कलात्मक काम पहायला मिळतं.10 / 10तामिळनाडूमध्येच तिरुनेलवेली शहराच्या मधोमध बांधण्यात आलेलं नेल्लईप्पर मंदिर स्वामी नेल्लईप्पर आणि श्री अरुल्थारुम कन्थिमथि अम्बल यांना समर्पित करतं. हे भारतातील प्राचीन मंदिरांपैकी एक मंदिर आहे. असं मानल जातं की हे मंदिर जवळपास 2500-3000 वर्षांपूर्वी मुलुठुकंडा रामा पांडियन यांच्याद्वारे बनविण्यात आलं होतं. हे मंदिर एकूण 71,000 वर्ग मीटर परिसरात बांधण्यात आलं आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications