The 10 famous temples of lord vishnu in India
श्रीहरी विष्णूची दहा प्रसिद्ध मंदिरं, केवळ दर्शनाने होतात सर्व मनोकामना पूर्ण By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2019 5:39 PM1 / 10श्री बद्रीनाथ उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यामध्ये अलकनंदाच्या किनाऱ्यावर विराजमान आहे. 2 / 10या मंदिरांचा वैष्णवांच्या 'चार धाम'मध्ये समावेश होतो. जगन्नाथ पुरीशी निगडीत अनेक अद्भूत कथा आहेत, ज्या आजही ऐकायला मिळतात. 3 / 10दक्षिण भारतातील तिरुचिरापल्ली शहराच्या श्रीरंगममध्ये हे मंदिर आहे. रंगानाथ स्वामी श्री हरिच्या मंदिरांपैकी एक आहे. असं सांगितलं जातं की, भगवान विष्णुंचा अवतार असलेल्या श्री रामांनी लंकेवरून परतल्यानंतर या मंदिरामध्ये पूजा केली होती. 4 / 10भगवान विष्णुंच्या सर्वात प्राचीन आणि प्रसिद्ध मंदिरांपैकी एक म्हणजे, व्यंकटेश्वर. हे मंदिर तिरुपतीजवळ असलेल्या तिरूमाला डोंगरावर आहे. 5 / 10महाराष्ट्रातील पंढरपूर जिल्ह्यामध्ये हे मंदिर आहे. संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजे, विठोबा. दरवर्षी लाखो वारकरी पायी चालत आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जातात. 6 / 10हे मंदिर भगवान विष्णुंचा अवतार श्री कृष्णाला समर्पित आहे. असं मानलं जातं की, द्वारकाधिश जवळपास 2000 वर्ष जुनं मंदिर आहे.7 / 10श्री कृष्णाचं हे मंदिर उत्तर प्रदेशातील वृंदावनामध्ये आहे. येथे श्री कृष्णाची मूर्ती त्रिभंग रूपामध्ये आहे. असं मानलं जातं की, या मूर्तीमध्ये भगवान कृष्ण सर्वात मोहक आणि आकर्षक रूपात दिसत आहेत. 8 / 10हे मंदिर विशाखापट्टनमजवळ आहे. सिंहाचलममध्ये भगवान विष्णुंच्या नरसिंह अवताराची पूजा करण्यात येते.9 / 10अयोध्येच्या राम मंदिराला कनक भवन असं म्हटलं जातं. येथए श्री हरिंच्या राम अवताराची पूजा करण्यात येते. या मंदिरामध्ये राम नवमीचा मोठ्या उत्सव आनंदाने साजरा करण्यात येतो. 10 / 10असं सांगितलं जातं की, येथे श्री कृष्णांच्या बालरूपाची पूजा केली जाते. ही मूर्ती नाथद्वारा मंदिर तयार करण्याआधीपासूनच स्थापन करण्यात आली होती. आणखी वाचा Subscribe to Notifications