शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

१७६० वेळा जाणाऱ्यांनाही माहिती नसेल, इकॉनॉमी क्लासच्या तिकीटावर बिझनेस क्लासची ट्रिक...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 10:11 AM

1 / 8
आजकाल सारेच नोकरदार एकदा तरी विमानाने प्रवास करतात. कधी ऑफिसच्या कामासाठी तर कधी फिरालया जाण्यासाठी. हे लोक सर्रास इकॉनॉमी क्लासचे तिकीट काढतात. कारण ते परवडते. परंतू तुम्हाला या तिकीटावर देखील बिझनेस क्लासचा प्रवास करता येऊ शकतो. कसे काय? 1760 वेळा विमान प्रवास करणाऱ्यांनासुद्धा ही ट्रिक माहिती नसेल...
2 / 8
बिझनेस क्लासचे तिकीट खूप महाग असते. यामुळे ते काढून प्रवास करणारे देखील मोजकेच असतात. अगदीच अर्जंट आहे आणि सामान्य तिकीट मिळाले नाही तरच लोक बिझनेस क्लासचे तिकीट काढतात. एका फ्लाईट अटेंडंटने ही ट्रिक सांगितली आहे. इकॉनॉमी क्लासच्या तिकीटावर तुम्ही एक रुपयाही न देता बिझनेस क्लासने प्रवास करू शकणार आहात.
3 / 8
तुम्ही जात असलेल्या विमानात बिझनेस क्लास असेल तर तुम्ही तिकीट काढताना एक युक्ती करा. इकॉनॉमी क्लासचे तिकीट काढताना ते पुढचे किंवा मधले नको तर पाठीमागचे काढा. मधल्याला विंगजवळचे तिकीट काढले तर किती नयनरम्य दृष्य दिसते असे म्हणाल आणि काढाल तर तुम्हाला बिझनेस क्लास कदापी नशीबात नाही.
4 / 8
यामागे वेट मॅनेजमेंटचे गणित आहे. अधिकतर एअरलाईन्समध्ये बिझनेस क्लास असतो. विमानाच्या मागच्या बाजुला इंजिन असते. यामुळे तिकडे जास्त भार असतो. यामुळे पुढील भागात कॉकपिट, पायलट, क्रू आणि पॅसेंजर असतात. पुढच्या भागात बिझनेस क्लास असतो. तर मागच्या भागात इकॉनॉमी क्लास.
5 / 8
जेव्हा बिझनेस क्लासमध्ये सीट रिकाम्या असतात तेव्हा मागच्या बाजुला वजन जास्त असते. पुढच्या भागाचा बॅलन्स राखण्यासाठी मग मागच्या भागातील पॅसेंजरना बिझनेस क्लासमध्ये घेतले जाते. अशाप्रकारे मागच्या भागातील वजन कमी केले जाते. ही झाली एक ट्रिक...
6 / 8
एअरहॉस्टेस सिएरा मिस्टने सांगितले की, पहिली ट्रिक काम करतेच, परंतू दुसरी ट्रिकही त्यासोबत असेल तर १०० टक्के काम होते. केबिन क्रूसोबत चांगले वर्तन तुम्हाला फर्स्ट क्लासचे तिकीट मिळवून देऊ शकते. यासाठी एन्ट्री गेटवर एअरहॉस्टेस सोबत चांगले वागावे. स्मितहास्य द्यावे.
7 / 8
जे प्रवासी या केबिन क्रूंना चॉकलेट, स्नॅक्स ऑफर करतात त्यांना बिझनेसची सीट मिळण्याचे अधिक चान्सेस असतात. एका रिपोर्टनुसार या ट्रिकने हजारो वेळा लोकांना बिझनेस सीट मिळाल्या आहेत.
8 / 8
काही लोकांची पर्सनॅलिटी सांगते की ते कोण आहेत... केबिन क्रू या लोकांना चटकन ओळखतात. हे लोक असे असतात, जे जर काही अनुचित घडले किंवा वैमानिकाला मदत लागली तर झटकन तयार होता. त्यात फायर फायटर, पोलीस, डॉक्टर, नर्स, पॅरामेडिक्स आणि सैन्यातील कर्मचारी मोडतात. त्यांना देखील वैमानिकाजवळच्या बिझनेस क्लासमध्ये सीट दिली जाते.
टॅग्स :airplaneविमानAirportविमानतळ