ज्वालामुखीपासून तयार झालेला 'हा' तलाव खरचं अद्भूत आहे! By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2019 7:13 PM
1 / 8 आइसलॅन्डमध्ये असलेल्या क्रेटर लेकला तेथील स्थानिक लोक विटी लेक असंही म्हणतात. 2 / 8 विटीचा अर्थ होतो नरक. जुन्या काळातील काही व्यक्तींचं असं म्हणनं असायचं की, नरक हा ज्वालामुखीच्या आतमध्ये असतो. 3 / 8 खरं तर आइसलॅन्डमध्ये असलेल्या या भागामध्ये अनेक क्रेटर असून हा तलाव या सर्व तलावांपैकी एक आहे. 4 / 8 या तलावाचा व्यास 300 मीटरपेक्षा अधिक असून हा तलाव 1724मध्ये ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे तयार झाली होती. 5 / 8 दरम्यान या तलावापर्यंत पोहोचण्यासाठी फार कठिण प्रवास करावा लागत असून फक्त काही महिन्यांमध्येच येथे पोहोचणं शक्य होतं. 6 / 8 या भागांमध्ये फक्त 450 मिमी पाऊस पडतो. अपोलो मिशनदरम्यान चंद्रावर पाठविण्यात आलेल्या अंतराळवीरांना येथेच भू-विज्ञानाची ट्रेनिंग दिली होती. या भागामध्ये आजही ज्वालामुखींचा उद्रेक होत असतात. 7 / 8 2010मध्ये वॉल्कॅनो एक्सपर्ट हजेल यांना येथे भूकंपाची जाणीव झाली होती. जी येथे असणाऱ्या ज्वालामुखींमुळे होती. 8 / 8 याव्यतिरिक्त एप्रिल 2012मध्ये या तलावातील बऱ्फ पूर्णपणे नष्ट झाला होता. ज्याचं कारण भूगर्भातील वाढलेली उष्णता होतं. आणखी वाचा