शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सुट्टी एन्जॉय करण्यासाठी हॉटेलमध्ये थांबण्यापेक्षा 'ही' जगातली सुंदर बेटं घेऊ शकता भाड्याने....

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2020 1:16 PM

1 / 11
सुट्टी एन्जॉय करण्याचे श्रीमंताचे शौकही वेगवेगळे असतात. कुणी प्रायव्हेट आयलॅंडवर जातात तर कुणी रिझॉर्ट बुक करतात. एका शांत, सुंदर आयलॅंडवर जाण्याची आणि तिथे वेळ घालवण्याची सर्वांचीच इच्छा असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अशा काही आयलॅंडबाबत सांगणार आहोत. जे तुम्ही रेन्ट घेऊ शकता आणि सुट्टीचा एन्जॉय करू शकता. (Image Credit : mirror.co.uk)
2 / 11
हॉन्डुरासमधील दनबर रॉक - हॉन्डुरासच्या तटावर वसलेल्या खाडी द्वीप समुहावरील ग्यूनान्जावर दनबर रॉक आयलॅंड आहे. यावर एक चमकदार पांढरा बंगला आहे. जेथून समुद्राचा सुंदर नजारा दिसतो. (Image Credit : booking.com)
3 / 11
बंगल्याच्या मागच्या बाजूने सुंदर बाग सुद्धा आहे. महत्वाची बाब म्हणजे या बंगल्यात सर्वात आधुनिक सोयी-सुविधा आहेत. या आयलॅंडचं रेन्ट १२०० डॉलर म्हणजे साधारण ७२ हजार ५०० प्रति आठवडा इतकं आहे.
4 / 11
पोरेर आयलॅंड, क्रोएशिया - क्रोएशियाच्या ईस्ट्रियन कोस्टालाइनवर असलेलं हे आयलॅंड छोटं नक्कीच आहे. पण फारच खास आहे. अर्धा एकर परिसरात असलेल्या या आयलॅंडवर ३५ मीटर उंच एक लाइट हाऊस आहे. (Image Credit : metro.co.uk)
5 / 11
या सुंदर लाइट हाऊसमध्ये चार बेडरूम आणि आणखी दोन सुंदर रूम्स आहेत. इथे पोहोचण्यासाठी लोकांना लाइट हाऊसचा कॅप्टन गाइड करतो. या आयलॅंडवर राहण्यासाठी आठवड्याला ६५० डॉलर म्हणजे ४० हजार रूपये रेन्ट द्यावं लागतं. (Image Credit : .pinterest.at)
6 / 11
ब्रेकवॉटर आयलॅंड, ब्रिटीश कोलंबिया, कॅनडा - या सुंदर आयलॅंडवर दोन बंगले आहेत. पण एकाचवेळी दोन वेगवेगळे ग्रुप यांचा वापर करू शकत नाहीत. कोणत्याही एका ग्रुपलाच पूर्ण सेट दिला जातो. जेणेकरून त्यांची प्रायव्हसी अबाधित रहावी. (Image Credit : privateislandsonline.com)
7 / 11
त्यासोबतच इथे तुम्हाला वेगवेगळे प्राणी आणि जीव बघायला मिळतात. तसेच तुम्ही इथे रेन्टने बोटही घेऊ शकता. जेणेकरून पर्यटक फिशिंग आणि डायव्हिंगचा आनंद घेऊ शकतील. इथे राहण्यासाठी तुम्हाला आठवड्यासाठी २ हजार डॉलर म्हणजेच १ लाख २५ हजार रूपये रेन्ट द्यावं लागेल.
8 / 11
एनेड्रिक आयलॅंड, द मार्शल आयलॅंड - द मार्शल आयलॅंडवर असलेलं एनेड्रिक आयलॅंड हे जन्नतपेक्षा कमी मानलं जात नाही. इथे राहण्यासाठी कॅम्पची गरज असते. (Image Credit : livemyjourney.wordpress.com)
9 / 11
वातावरण बिघडलं तर इथे केवळ एकाच बिल्डींगचा आधार आहे. इथे राहण्यासाठी तुम्हाला आठवड्याला ५०० डॉलर म्हणजे ३१ हजार रूपये रेन्ट द्यावं लागेल. (Image Credit : privateislandsonline.com)
10 / 11
लिस्सेनुग आयलॅंड, पापुआ न्यू गिनी - या आयलॅंडवर राहण्यासाठी केवळ एकच लोकेशन आहे. जिथे ४ बंगले आहेत. यात जास्तीत जास्त १४ लोक राहू शकतात. (Image Credit : diveplanit.com)
11 / 11
इथे हिरव्यागार झाडांच्या मधोमध तयार केलेल्या घरांमध्ये राहण्याची एक वेगळीच मजा आहे. इथे सुंदर समुद्रावर एन्जॉय करण्यासोबतच डायव्हिंगचाही आनंद घेता येऊ शकतो. तर इथे राहण्यासाठी तुम्हाला ७५० डॉलर म्हणजे ४७ हजार रूपये इतकं रेन्ट द्यावं लागेल. (Image Credit : vladi-private-islands.de)
टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सJara hatkeजरा हटकेtourismपर्यटन