स्नो फॉल अनुभवण्यासाठी उत्तम पर्याय आहेत 'ही' ठिकाणं! By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2018 8:05 PM
1 / 6 सध्या विंटर सीझन सुरू झाला असून काही दिवसांतच न्यू ईयर येणार आहे. अशातच अनेकजण फॅमिलीसोबत फिरायला जाण्यासाठी ऑउटऑफ स्टेशन जाण्याची तयार करत आहेत. जर तुम्हीही डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला भारतातील काही बेस्ट डेस्टिनेशन्सबाबत सांगणार आहोत. या ठिकाणांना भेट देऊन तुम्ही स्नोफॉलची मजा अनुभवत न्यू ईयर सेलिब्रेट करू शकता. 2 / 6 काश्मीर हे थंडीमध्ये फिरण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन आहे. जर तुम्हाला स्नो फॉलची मजा अनुभवायची असेल तर तुम्ही काश्मीरच्या सोनमार्ग येथे फिरण्यासाठी जाऊ शकता. येथे तुम्ही बर्फाने आच्छादलेल्या तलावांसोबत स्नोबोर्डींगचा आनंदही घेऊ शकता. थाजीवास ग्लॅशियर येथील सर्वात सुंदर ग्लॅशिअरपैकी एक आहे. 3 / 6 हिमालयाच्या कुशीत वसलेले औली हे कदाचितच कोणाला ठाऊक असेल. थंड हवेचे ठिकाण व प्रेक्षणीय स्थळ असून येथे पर्यटक वर्षभर भेट देत असतात. औली हिमालयातील पर्वत रांगांमध्ये स्कीइंगसाठी प्रसिद्ध आहे. नोव्हेंबर ते फेब्रुवारी येथे जाण्यासाठी योग्य काळ मानला जातो. इथे 3 किलोमीटर लांब आणि 500 मीटर लांब स्की लिफ्ट आहे. तसेच इथे अनेक स्की रिसॉर्टदेखील आहेत. 4 / 6 गुलमर्ग म्हणजे काश्मीरमधील सर्वात सुंदर ठिकाण. विंटर सीझनमध्ये या ठिकाणी देशी-विदेशी पर्यटक स्नोफॉल अनुभवण्यासाठी येत असतात. येथे तुम्ही स्नोफॉलसोबतच स्कीइंगची मजाही अनुभवू शकता. 5 / 6 मनालीला थंडीमध्ये जाणं केव्हाही चांगलं, असं अनेक जण तुम्हाला सांगतील, सुचवतील. कारण इथलं प्रमुख आकर्षण म्हणजे हिमवृष्टी. बर्फाने आच्छादलेल्या महाकाय हिमालयाचे सौंदर्य न्याहाळणं म्हणजे सुखचं. न्यू ईयर सेलिब्रेट करण्यासाठी तुम्ही येथे जाऊ शकता. 6 / 6 शिमला म्हणजे हनीमून कपल्ससाठी जन्नत समजलं जातं. येथे हायकिंग, स्कीइंग, स्की स्लोप आणि निसर्गसौंदर्या न्याहाळण्यासाठी उत्तम पर्याय आहे. आणखी वाचा