शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'या' 5 ब्रीजवरून चालणंदेखील धोकादायक!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2018 6:32 PM

1 / 6
जगभरामध्ये अनेक चित्रविचित्र गोष्टी आढळतात. त्यातीलच असे काही ब्रीज आहेत ज्यांच्यावरून चालणं म्हणजे एक अडवेंचर्स अनुभव आहे. त्यांमुळेच बे ब्रीज पाहण्यासाठी अनेक पर्यंटक येत असतात. या ब्रीजवरून जाणं अत्यंत धोकादायक समजलं जातं. तरीही अनेक लोक हा अनुभव घेण्यासाठी या ठिकाणांना भेट देतात.
2 / 6
कुजको गावामध्ये असलेला हा ब्रीज एका दोरखंडाच्या सहाय्याने तयार करण्यात आला आहे. हा पूल तयार करण्यासाठी आदिवासी जमातीच्या लोकांनी पारंपारिक पद्धतीचा वापर केला आहे. जंगलातील गवतापासून तयार करण्यात आलेला हा पूल 120 फूट लांब आहे. याची खास गोष्ट म्हणजे, हा ब्रीज दरवर्षी बांधण्यात येतो. हवेमध्ये झुलणाऱ्या या ब्रीजने 500 वर्षांपासून पेरू शहराला जोडून ठेवलं आहे.
3 / 6
चीन देशाची ओळख नवनवीन तंत्रज्ञान वापरून आगळ्या-वेगळ्या वस्तू तयार करण्यासाठी ओळखलं जातं. त्यामुळे चीनच्या या ब्रीजचा समावेश धोकादायक ब्रीजच्या यादीमध्ये करण्यात आला आहे. 1230 फुट उंच आणि 984 फुट लांब असलेल्या या ब्रीजला जगातील सर्वात उंच ब्रीज म्हणून ओळखले जाते.
4 / 6
आपण आतापर्यंत दोन शहरांना जोडणाऱ्या ब्रीजबाबत ऐकलं असेल पण नॉर्थ आयर्लंडमध्ये एक असा कृत्रिम ब्रीज तयार करण्यात आला आहे. जो दोन डोंगरांना जोडतो. जमिनीपासून 100 फुट उंचावर दोरखंडाचा वापर करून तयार करण्यात आलेल्या या ब्रीजवरून चालताना फार रोमांचक अनुभव येतात.
5 / 6
1889मध्ये कॅनडामध्ये हा ब्रीज बांधण्यात आला. नदी पार करण्यासाठी तयार करण्यात आलेला हा ब्रीज 230 फुट उंच आणि 460 फुट लांब आहे.
6 / 6
स्वित्झर्लंन्डच्या निसर्गसौंदर्यामध्ये तयार करण्यात आलेला एक ब्रीज आहे. जो बर्फाने आच्छादलेल्या दोन पर्वतांना जोडतो. याला युरोपमधील सर्वात उंच फुल म्हणून ओळखलं जातं.
टॅग्स :tourismपर्यटन