7 popular tourist locations the world has lost over the last 5 years
उद्ध्वस्त झाली 'ही' अनोखी 7 पर्यटन स्थळं; पाहा आधीचे आणि आताचे फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2019 4:13 PM1 / 8मागील 5 वर्षांमध्ये जगभरामधील अनेक गोष्टी नष्ट झाल्या आहेत.अनेक वर्षांपासून जपण्यात आलेल्या या वास्तू फक्त 5 वर्षांमध्ये वेगवेगळ्या कारणांनी नष्ट होणं हा फार चिंतेचा विषय आहे. काही ठिकाणं नैसर्गिक आपत्तीची शिकार झाली तर काहीं मानवनिर्मित आपत्तीला बळी पडले. जाणून घेऊया काही लोकप्रिय टूरिस्ट लोकेशंसबाबत जी मागील 5 वर्षांमध्ये नष्ट झाली आहेत... 2 / 8जवळपास 8 शतकं जुनी असलेली ही वास्तू 15 एप्रिल, 2019मद्ये लागलेल्या एका भीषण आगीमध्ये नष्ट झाली. अनेक युद्ध, राजनीतिक आणि धार्मिक युद्धांचा साक्षीदार ठरलेल्या नॉट्रे डॅम चर्चचं आगीमुळे फार नुकसान झालं आहे. चर्चच्या जीर्णोद्धाराचं काम सुरू असतानाच आग लागली. त्यामध्ये अनेक ऐतिहासिक गोष्टी नष्ट झाल्या. 3 / 8लेगजिरा बीचवर सुंदर मेहराबचा एक जोडा मोरक्कोची ओळख आणि प्रतिक आहे. सप्टेंबर 2016मध्ये त्यांपैकी एक मेहराब पडला. हे पाहण्यासाठी दरवर्षी अनेक पर्यटक येथे येत असत. 4 / 8सीरियातील परिस्थिती या ऐतिहासिक वास्तू नष्ट होण्याचं मुख्य कारण आहे. 2015मध्ये मेन टेम्पल उद्ध्वस्त झालं. पहिल्या शतकातील हे एक महत्त्वाचं धार्मिक भवन होतं. आता या अवशेषांमधील फक्त काही स्तंभच उभे आहेत. 5 / 8जोशुआ ट्री नॅशनल वर्क एक आश्चर्यचकित करणारं स्थान आहे. येथे वाळवंटातील अनेक दुर्मिळ गोष्टी अस्तित्त्वात आहेत. येथे अनेक दुर्मिळ प्रजातीच्या वनस्पती आहेत. येथील प्रशासनाने हे काही दिवसांसाठी बंद ठेवलं होतं. ज्यानंतर जानेवारी 2019मध्ये हे पुन्हा सर्वांसाठी खुलं करण्यात आलं. पण या पार्कच्या रक्षणासाठी कोणतीच व्यवस्था नसल्यामुळे येथे येणाऱ्या लोकांनी येथील अनेक झाडं कापून आग लावली. त्यामुळे येथील अनेक वनस्पती नष्ट झाल्या आहेत. 6 / 81909मध्ये एडवर्ड एरिकसन यांनी ही जलपरी तयार केली होती. दोन वेळा याची तोडफोड करण्यात आली. एवढचं नव्हे तर या जलपरीच्या प्रतिमेचे हातही तोडण्यात आले. अनेकदा या प्रतिमेची डागडुजी करण्यात आली असून ग्राफिटीच्या मदतीने संपूर्ण प्रतिमा कव्हरही करण्यात आली होती. 7 / 8जानेवारी आणि फेब्रुवारी 2016 मध्ये तस्मानियामध्ये जंगलामध्ये वणवा लागला होता. त्यामुळे सर्वात सुंदर तलाव म्हणून ओळखला जाणारा मकिंज लेक उद्ध्वस्त जाला होता. जंगलामध्ये लागलेल्या या वणव्यामुळे अनेक दुर्मिळ वनस्पतीही नष्ट झाल्या. या वणव्यामध्ये जवळपास 20,000 हेक्टरवर पसरलेलं हे वनक्षेत्र जळून खाक झालं. 8 / 8अत्यंत खेदजनक बाब म्हणजे, या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांनीच काही क्षणांतच अनेक वर्षांपूर्वीचा इतिहास नष्ट केला. जून 2018मध्ये काही मुलांनी एकमेकांच्या मदतीने एक दगड पाडला. हवा आणि बर्फ यांमुळे अनेक वर्षांपासून या दगडांची ही आकृती तयार झाली होती. आणखी वाचा Subscribe to Notifications