awesome facts about dangerous pamban bridge rameshwaram rail route of india
'हा' आहे 100 वर्ष जुना पूल; शाहरुखच्या प्रसिद्ध चित्रपटाचंही झालंय शुटिंग By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2019 1:39 PM1 / 8पांबन पूल हा भारताच्या तमिळनाडू राज्याच्या रामनाथपुरम जिल्ह्यामधील एक सागरी रेल्वे पूल आहे. 6,776 फूट लांबीचा हा पूल रामेश्वरम द्वीपाला मुख्य भारतीय भूमीसोबत जोडतो. 2 / 824 फेब्रुवारी 1914 मध्ये वाहतुकीस खुला केला गेलेला पांबन रेल्वे पूल भारतामधील सर्वात पहिला सागरी पूल आहे.3 / 8मुंबईमधील वांद्रे-वरळी सागरी महामार्ग बांधून पूर्ण होण्याअगोदर हा पूल देशातील सर्वात लांब सागरी पूल होता. 4 / 812 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले रामेश्वरम गावामध्ये फक्त या पुलाद्वारेच प्रवेश शक्य आहे. रेल्वेवाहतूकीसाठी एक व मोटार वाहतूकीसाठी एक असे दोन वेगळे पूल अस्तित्वात असून दोन्ही पुलांना एकत्रितपणे पांबन पूल असेच म्हटले जाते.5 / 8जुन्या पुलाच्या शेजारी 1988 साली मोटार वाहतूक पूल बांधला गेला जो रेल्वे पूलाला पूर्णपणे समांतर धावतो.6 / 8अभिनेता शाहरूख खानच्या 'चेन्नई एक्स्प्रेस' या चित्रपटातील एका सीनचं शुटिंग देखील याच पुलावर करण्यात आलं आहे. 7 / 8पांबन पुलांचं बांधकाम ब्रिटीश रेल्वेने 1885 मध्ये सुरू केले होते. तर 1914 मध्ये या पुलाचे बांधकाम पूर्ण झाले. हा 100 वर्ष जुना पूल आहे8 / 81914 ते 1964 सालापर्यंत चेन्नईच्या इग्मोर स्थानकापासून रामेश्वरम बेटाच्या धनुषकोडी या गावापर्यंत मीटर गेज रेल्वे धावत असे. आणखी वाचा Subscribe to Notifications