शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आता Bali ला फिरायला जाणे महागणार, टुरिझम टॅक्समुळे खिशाला लागणार कात्री!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2024 3:19 PM

1 / 7
इंडोनेशियातील बाली बेटाचे सौंदर्य जगभर प्रसिद्ध आहे. त्यामुळे दरवर्षी लाखो लोक बालीला भेट देतात. पण आता बालीमध्ये जाणाऱ्या पर्यटकांसाठी एक धक्कादायक बातमी आहे. कारण आता पर्यटकांना बालीमध्ये जाण्यासाठी टुरिझम टॅक्स (पर्यटक कर) भरावा लागू शकतो.
2 / 7
बाली हे सर्वोत्तम बजेट डेस्टिनेशन मानले जाते. बालीची बहुतेक अर्थव्यवस्था पर्यटनातून येते. अशा परिस्थितीत बाली येथील सरकार टुरिझम टॅक्स वसूल करू लागले तर पर्यटकांच्या खिशावरचा खर्च वाढेल.
3 / 7
2024 पासून इंडोनेशियाचे रिसॉर्ट डेस्टिनेशन बाली आपल्या संस्कृतीचे जतन करण्यासाठी आणि निधी उभारण्यासाठी येथे येणाऱ्या पर्यटकांवर $10 चा टॅक्स लागू करणार आहे.
4 / 7
गव्हर्नर आय वेयान कोस्टरच्या मते, बालीमध्ये येणाऱ्या परदेशी पर्यटकांना एकरकमी ऑनलाइन टुरिझम टॅक्स भरावे लागेल. हा टॅक्स फक्त परदेशी पर्यटकांवर लागू केला जाईल, तर स्थानिक पर्यटकांना यातून सूट दिली जाईल.
5 / 7
बालीला गेल्या वर्षी 20 लाखांहून अधिक पर्यटकांनी भेट दिली होती. दरम्यान, बालीमध्ये नियम मोडणाऱ्यांविरोधात झिरो टॉलरन्सचे धोरण अवलंबले जाणार आहे. नवीन टॅक्स पर्यटकांना आपल्या देशात येण्यापासून रोखणार नाही.
6 / 7
टॅक्सच्या माध्यमातून जमा होणारा पैसा पर्यावरण सुधारण्यासाठी, बेटाची संस्कृती जपण्यासाठी आणि पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी वापरला जाईल. ज्यामुळे बालीला भेट देणाऱ्या लोकांसाठी अधिक आरामदायी आणि सुरक्षित प्रवास अनुभव सुनिश्चित केला जाईल.
7 / 7
केवळ बालीच नाही तर भूतान आपल्या सौंदर्यासाठी जगभर प्रसिद्ध आहे. या देशात भारतीयांना भेट देण्यासाठी व्हिसा किंवा पासपोर्टची गरज नाही. भारतीयांना फक्त वैध फोटो आणि ओळखपत्र दाखवावे लागेल. या सगळ्यात विदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी भूतानने आपला दैनंदिन टूरिस्ट टॅक्स 16,509 रुपयांवरून 8254 रुपयांवर आणला आहे. पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे येथे तुम्हाला टूरिस्ट गाइड देखील दिला जाईल.
टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सbusinessव्यवसाय