शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

हे आहे भारत-भूतान सीमेवरचे सुंदर गाव

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2018 5:21 PM

1 / 7
भारताच्या शेजारील देशांपैकी भूतान हा देश सृष्टीसौंदर्याने नटलेला आहे. येथील प्राचीन आणि ऐतिहासिक इमारती सुंदर आहेत. अशा या भूतानमध्ये प्रवेश करण्यासाठी भारतातील तितक्याच सुंदर गावातून जावे लागते.
2 / 7
या सुंदर गावाचं नाव आहे दोआर. या गावाला भारत आणि भूतान सीमेवरील शेवटचे गाव मानले जाते कारण इथून पुढे भूतानची सीमा सुरू होते.
3 / 7
या ठिकाणी भारत आणि भूतान सीमेवर एक द्वार बनवण्यात आले आहे. त्यामुळे या गावाचे नाव दोआर असे पडले. रस्ते मार्गाने भूतानमध्ये जाणाऱ्यांसाठी दोआर हे प्रवेशव्दारासारखे आहे.
4 / 7
दोआर हे हिमालयाच्या पायथ्याशी वसलेले आहे. पर्वतीय भाग असल्याने येथे अधूनमधून पाऊस पडत असतो.
5 / 7
पर्यटकांना वन्यजीव पाहता यावेत यासाठी येथे एक अभयारण्यही बनवण्यात आले आहे. येथे विविध प्रकारच्या वन्यजीवांचे वास्तव्य असून, युनेस्कोने या अभयारण्याचा जागतिक वारशांमध्ये समावेश केला आहे.
6 / 7
दोआर येथून संकोस नदी वाहते. या नदीमुळे दोआरचे दोन भागात विभाजन झाले आहे. या नदीमध्ये तुम्ही रिव्हर राफ्टिंगचा आनंदही घेऊ शकता.
7 / 7
दोआरला येण्यासाठी गोहाटी आणि बागडोगरा हे नजीकचे विमानतळ आहेत. तसेच येथे येण्यासाठी जलपैगुडी आणि कुचबिहार स्थानकांमधून ट्रेनसुद्धा उपलब्ध आहेत.
टॅग्स :tourismपर्यटनwest bengalपश्चिम बंगालBhutanभूतान