शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ऐतिहासिक ठिकाणी फिरायला जाण्यासाठी नाणेघाट किल्ला, एकदा नक्की भेट द्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2020 2:18 PM

1 / 10
सतत त्याच त्याच ठिकाणी जाऊन जर तुम्ही बोअर झाला असाल तर आज आम्ही तुम्हाला एका इंटरेस्टींग ठिकाणाबद्दल सांगणार आहोत. तुम्हाला ऐतिहासिक वास्तु आणि किल्ल्यांना भेट द्यायची असेल तर नाणेघाट किल्ल्याला नक्की भेट द्या. फक्त ऐतिहासिक वास्तु म्हणून नाही तर इतर अनेक चांगले आणि फिरण्यासारखे स्पॉट्स या ठिकाणी आहेत. चला तर मग जाणून घेऊया या किल्ल्याबद्दल.या ठिकाणी पोहोचण्यासाठी तुम्हाला अतिखर्च करायची काहीही आवश्यकता नाही.
2 / 10
महाराष्ट्रातील एक पुरातन घाट म्हणून नाणेघाटाची ओळख आहे. या घाटाचा मार्ग जुन्नर आणि कोकणातील भाग यांना जोडतो. व्यापाराच्यादृष्टीने सोयीस्कर असावे म्हणून याची निर्मिती झाली होती. सातवाहन काळातील हा घाट असल्यांचा अंदाज वर्तवला जातो. म्हणजेच सातवाहन राज्यांच्या साम्राज्यात प्रवेश करण्यासाठी नाणेघाटातून जावं लागतं.
3 / 10
नाणेघाटात गेल्यानंतर प्राचीन काळातील गुहा पहायला मिळतात. या गुहांच्या भितींवर अनेक लेख लिहिलेले आहेत. हे भिंतीवरील लेख ब्राम्ही लिपीतील आहे.
4 / 10
नाणेघाटावरील विस्तीर्ण पठारावरून आपल्याला गोरखगड, हरिश्चंद्रगड, सिध्दगड, मच्छिद्रगड, भैरवकडा, कोकणकडा यांचे नयनरमरम्य दृश पाहायला मिळते.
5 / 10
नाणेघाटाची संरक्षक फळी ही शिवनेरी, हडसर, चावंड आणि जीवधन या चार किल्ल्यानी बनलेली आहे. साठ मीटर लांब आणि जागोजाबी दोन ते पाच मीटर रुंद अशी ही नाणेघाटाची नळी आहे.
6 / 10
अलिकडे वापरात येणाऱ्या गुहेत तिन्ही भिंतीवर लेख आहेत. हा लेख एकूण २० ओळींचा असून मध्ये आगातील भिंतीवर १० तर उजवीकडील भागावर दहा ओळी आहेत.
7 / 10
या गुहेत सातवाहनांची शिल्पे देखील कोरलेली आहेत.
8 / 10
गोरखगड, मच्छिंद्रगड, सिद्धगड, हरिश्चंद्रगड, भैरवकडा, कोकणकडा पाहताना मनाला आनंद होतो.
9 / 10
एक वेगळा आणि विलक्षण अनुभव तुम्हाला या ठिकाणाला भेट दिल्या नंतर येईल.
10 / 10
एक वेगळा आणि विलक्षण अनुभव तुम्हाला या ठिकाणाला भेट दिल्या नंतर येईल.
टॅग्स :FortगडTravel Tipsट्रॅव्हल टिप्स