best trekking places near Delhi
दिल्लीला गेलात अन् या ठिकाणाला भेट दिली नाहीत; तर काय पाहिलंत? By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2021 6:51 PM1 / 10अनेकजण सुट्टीच्या दिवसात ट्रेकिंगला जातात. हिवाळा सुरू झाला की ट्रेकिंगचा सीझनही सुरू होतो.2 / 10या काळात दम लागत नाही आणि फारसा घामही येत नाही. आल्हाददायक वातावरण आणि बोचरी थंडी या पार्श्वभूमीवर ट्रेकिंग करताना खूप धम्माल येते.3 / 10तुम्हीही दिल्लीला जाण्याचा विचार करत असाल तर तुम्ही ट्रेकिंगसाठी दिल्लीजवळच्या या ठिकाणी जाऊ शकता.4 / 10अनेक लोक असे असतात ज्यांना साहसी खेळ खेळायला किंवा अॅडवेंचर करायला आवडतात. अशात अनेक जणांना ट्रेकिंगला जायला आवडतं5 / 10मग प्रश्न पडतो नेमकं कुठे जायचं फिरायला. तर आज आम्ही तुम्हाला दिल्लीजवळच्या अशा ठिकाणांबद्दल सांगणार आहोत जिथे तुम्ही ट्रेकिंगला जाऊ शकता.6 / 10गढवाल : दिल्लीपासून 298 किमी अंतरावर असलेल्या प्रसिद्ध गढवाल पर्वतरांगेतील दाट दरीचा ट्रेक तुम्ही पाहिला नसेल तर हे नेहमीच टेकर्ससाठी योग्य ठिकाण आहे. आजूबाजूला बर्फाने वेढलेले इथले नजारे भटक्यांना आवडतात.7 / 10केदारकंठ : केदारकंठ ट्रेक हे दिल्लीच्या शेजारी वसलेले एक उत्तम ठिकाण आहे, जिथले चित्तथरारक दृश्य प्रत्येकाला वेड लावते. इथे तुम्ही कधीही ट्रेक करू शकता. हा ट्रेकिंग पॉइंट दिल्लीपासून 428 किमी अंतरावर आहे.8 / 10हाटू पीक : बर्फाच्छादित प्रचंड पर्वत आणि दऱ्या, हाटू पीक ट्रॅक ही प्रवाशांची पहिली पसंती आहे. येथील साहस सर्वांनाच वेड लावते. जर तुम्हाला या ट्रेकचा आनंद घ्यायचा असेल तर इथे एकदा नक्की जा. येथे जाण्यासाठी मार्च आणि मे हे महिने खास आहेत.9 / 10देवरिया ताल : पांढर्या बर्फाच्या टेकड्यांमध्ये लपेटलेल्या देवरिया तालाच्या प्रसिद्ध ट्रेकर्समध्ये जायला कोणाला आवडणार नाही. या ठिकाणचे सौंदर्य लक्षवेधी आहे.10 / 10रूपकुंड : रूपकुंड ट्रेक त्याच्या विलोभनीय दृश्यांसाठी ओळखला जातो. हे एक सुंदर आणि प्रसिद्ध ट्रेकिंग डेस्टिनेशन आहे. दिल्लीपासून 308 किमी अंतरावर रूपकुंड ट्रेक आहे. तुम्ही दिल्लीत राहत असाल तर इथे एकदा अवश्य भेट द्या. आणखी वाचा Subscribe to Notifications