The billionaire people around the world come to the place 'these' money
जगभरातली अब्जाधीश लोक 'या' ठिकाणी येऊन उधळतात पैसे By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2019 1:32 PM1 / 8श्रीमंत लोक सुट्टी एन्जॉय करण्यासाठी बऱ्याचदा आयलंडची निवड करतात. एखाद्या डिझर्ट आयलंडवर आलिशान हॉटेलमध्ये प्रसिद्ध अभिनेते, उद्योगपती धमाल करतात.2 / 8नेकर द्वीपही हॉलिवूड कलाकारांमध्ये प्रसिद्ध आहे. बराक ओबामा, प्रिन्स हॅरी, केट मॉस, मारिया केरी यांसारख्या नावाजलेल्या व्यक्ती या द्वीपाला आवर्जून भेट देतात. 3 / 8फ्रान्समधील कोटे डी'ज़ूर हे ठिकाणही फार प्रसिद्ध आहे. दक्षिणपूर्व फ्रान्सच्या भूमध्य सागरी भागात हे ठिकाण असून, इथे आलिशान रेस्टॉरंट, हॉटेल आहेत. 4 / 8फ्रान्समधील कोटे डी'ज़ूर या ठिकाणाला फ्रेंच रिवेराही संबोधलं जातं. फ्रेंच रिवेरामध्ये अनेक मोठमोठाले बंगले आहेत. उन्हाळ्यातील सुट्टी एन्जॉय करण्यासाठी हे ठिकाण बेस्टच आहे. 5 / 8तसेच फ्रेंच पोलिनेशियामधील बोरा बोरा हे ठिकाणही सुट्टीची मज्जा लुटण्यासाठी भारी आहे. इथे जगभरातले श्रीमंत लोक येत असतात. 6 / 8जेनिफर एनिस्टन आणि जस्टिन थेरॉक्स यांनी काही दिवसांपूर्वीच बोरा बोराची हनिमूनसाठी निवड केली होती. 7 / 8मालदीवमध्ये अथांग पसरलेले समुद्रकिनारे आणि तिकडची शांतता नेहमीच पर्यटकांना आकर्षून घेते. मालदीवमध्ये अनेक नयनरम्य द्वीपसमूह आहेत. मालदीवमधलं सोनेवा फुशी हे रिसॉर्टही एका खासगी आयलंडवर आहे. 8 / 8इथे राहण्यासाठी पूर्ण व्हिला बुक करावा लागतो. या व्हिलामध्ये अनेक उच्चप्रतीच्या सोयी-सुविधा उपलब्ध आहेत. या व्हिल्यामधून आपण समुद्राच्या सौंदर्याचा मनमुराद आनंद लुटू शकतो. आणखी वाचा Subscribe to Notifications