cities with best night life experiences in the world
जगभरातील 'ही' ठिकाणं आहेत नाइट लाइफसाठी प्रसिद्ध! By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2018 3:56 PM1 / 5जगभरामध्ये अशी अनेक ठिकाणं आहेत जिथे आयुष्यात एकदा तरी भेट देणं गरजेचं आहे. यातील अनेक शहरं अशी आहेत ज्याठिकाणी फिरण्याची मजा फक्त रात्रीच येते. या शहरांमधील नाइटलाइफ अनुभवण्यासाठी येथे देशो-विदेशीचे अनेक पर्यटक येतात. जाणून घेऊयात जगभरातील अशा शहरांबाबत ज्या शहरांचं खरं सौंदर्य रात्री अनुभवता येतं.2 / 5रोमॅन्टिक डेस्टिनेशन म्हणून सर्वजण पॅरिसला ओळखतात. या शहराचं सौंदर्य फक्त दिवसाच नाही तर रात्रीही खुलून दिसतं. अनेक जण या शहरामध्ये रात्री रस्त्यावरून फिरताना तुम्हाला दिसतील. 3 / 5एम्सटर्डम एक सुंदर शहर आहे. या शहरात फिरण्याची खरी मजा ही रात्री येते. येथे अनेक नाइट कॅफे, डिस्को, रेस्टॉरंट्स आहेत. तरूणांना हे शहर फार आकर्षित करते. 4 / 5बॅन्कॉकच्या नाइट मार्केटमध्ये शॉपिंग करणं हे फार सुखावणारं आहे. शॉपिंगव्यतिरिक्त तुम्ही येथे चविष्ट अशा स्ट्रिट फूडचा आनंद घेऊ शकता. बॅन्कॉक येथील मार्केट्ससाठी प्रसिद्ध आहे. 5 / 5टोकियोमध्ये रात्री फिरण्याची मजा काही औरच. स्वादिष्ट जेवण, कॅरियोके बार, नाइट क्लब्स यांसारख्या गोष्टींमुळे तरूणाई या शहरात फिरण्यासाठी फार उत्सुक असते. आणखी वाचा Subscribe to Notifications