Datia Palace interesting facts : It is used for only one night, Know the reason
Datia Palace : एक असा महाल ज्याचा गेल्या ४०० वर्षात केवळ एका रात्रीच वापर केला गेला, पण असं का? By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 12:02 PM1 / 7Datia Palace Interesting Things: भारतात असे अनेक प्राचीन महाल आहेत ज्यांचा मोठा इतिहास आहे. मध्य प्रदेश हे एक असं राज्य आहे जिथे अनेक आलिशान महाल आणि किल्ले बघायला मिळतात. महत्वाची बाब म्हणजे येथील महाल अनेक वर्षांपासून चांगल्या स्थितीत आहेत. यातीलच एक महाल म्हणजे दतिया महाल. गेल्या ४०० वर्षांपासून हा महाल ठामपणे उभा आहे. या महालाची एक हैराण करणारी बाब म्हणजे ४०० वर्षात या महालाचा केवळ १ रात्रीसाठी वापर करण्यात आला होता.2 / 7असं सांगितलं जातं की, ग्वाल्हेरवर सिंधिया यांचं राज्य येण्यापूर्वी हा भाग मुघल साम्राज्यात होता. हळूहळू मुघल त्यांच्या राज्याचा विस्तार करत होते. तेच दुसरीकडे अकबरचं वय वाढत होतं. अशात अकबरचं त्याचा मोठा मुलगा सलीमसोबत फार पटत नव्हतं. एक अशी वेळ आली जेव्हा सलीमने वडिलांविरोधात बंड पुकारलं आणि एका कोर्टाची स्थापना केली. ज्याला सध्या आपण इलाहाबाद कोर्ट नावाने ओळखतो. सलीमने हे केल्यावर त्याला मनवण्यासाठी अकबराने आपला प्रधानमंत्री अबुल फजलला दिल्लीला पाठवला. (Image Credit : enigmaticindia.com)3 / 7असं म्हटलं जातं की, अबुल फजलची इच्छा होती की, युवराज सलीमने राजगादीवर बसू नये. या संधीचा फायदा घेत तो सलीमची हत्या करणार होता. अबुल फजल इलाहाबादला येणार असल्याचं सलीमला समजलं. अशात तो वाईट परिस्थितीत स्वत:ला मजबूत करण्याच्या तयारीला लागला. तेव्हाच बीर सिंह देव त्याच्याकडे अकबराच्या वजीराला मारण्याचा प्रस्ताव घेऊन आले. (Image Credit : hellotravel.com)4 / 7बीर सिंह देव त्यावेळी केवळ एक जमीनदार होता. त्यालाही सलीमप्रमाणे बादशाह अकबरच्या नीति पसंत नव्हत्या. त्याने अकबर विरोधातील अनेक विद्रोहांचं नेतृत्व केलं होतं. असंही सांगितलं जातं की, सलीम स्वत: त्याच्याकडे मदत मागण्यासाठी गेला होता. बीर सिंह देवने हे मिशन सुरूच ठेलं आणि अबुल फजलचा खात्मा केला. अबुलचं कापलेलं शिर तो सलीमसमोर घेऊन गेला. (Image Credit : sahasa.in)5 / 7या घटनेनंतर बीर सिंह देव सलीमच्या जवळ आला होता तर दुसरीकडे तो सम्राट अकबराच्या नजरेतही आला होता. अकबरला कोणत्याही स्थितीत बीर सिंह देवला ताब्यात घ्यायचं होतं. इकडे सलीम आणि बीर सिंह देव खास मित्र बनले होते. बीर सिंहने देव आयुष्यातील अनेक वर्ष अकबराच्या सैनिकांपासून वाचवण्यात घालवले. (Image Credit : architexturez.net)6 / 7अशातच अकबरचा मृत्यू झाला. तोपर्यंत सलीमने वडिलांसोबतचा वाद मिटवला होता आणि त्यांच्या निधनानंतर तो लगेच युवराजचा राजा बनला होता. अशात सलीमने त्याचं नाव बदलून जहांगीर ठेवलं होतं. राजा बनताच त्याने बीर सिंह देवाचे उपकार फेडण्यासाठी त्याला ओरछाच्या गादीवर बसवलं. काही वर्षांनी सलीम जुन्या मित्राला भेटण्यासाठी जाणार होता. अशात त्याने आपल्या राज्यात ५२ इमारते तयार करण्याचा आदेश दिला. यातील एक जागा होती दतिया. हा महाल त्याने बीर सिंह देव याला भेट म्हणून दिला होता. (Image Credit : insider.in)7 / 7दतिया महालाला बीर सिंह देव महाल आणि सतखंडा महाल नावानेही ओळखलं जात. प्लाननुसार बादशाह सलीम या महालात आला आणि ओरछाला जाण्याआधी त्याने या महालात एक रात्र घालवली. हा महाल भेटवस्तू असल्याने ना बीर सिंह देव आणि ना त्याच्या परिवाराने कधी याचा वापर केला. हेच कारण आहे की ४०० वर्षापासून दतिया महाल तसाच आहे. त्याचा आजपर्यंत कुणी वापर केला नाही. (Image Credit : architecturaldigest.in) आणखी वाचा Subscribe to Notifications