ठळक मुद्दे* मुळात इथल्या दुर्गापूजेची सुरूवात प्रतिपदेपासून होत नाही. तर ती पंचमीला होते. म्हणजे पाचव्या दिवशी दुर्गेचं आगमन होतं. आणि सर्वांत महत्त्वाचा दिवस असतो महाअष्टमीचा.* आपल्याकडे ज्याप्रमाणे सकाळ-संध्याकाळ गणपतीची आरती केली जाते, त्याचप्रमाणे कोलकात्यात दुर्गापूजेच्या वेळी मंडपांमधून संध्या आरती केली जाते. या संध्या आरतीचं वैशिष्ट्य म्हणजे ‘ढाक’च्या तालावर केला जाणारा ‘धुनुची नाच’.* दुर्गाविसर्जनाच्या दिवशी इथला चुकवू नये असा कार्यक्र म म्हणजे ‘सिंदूर खेला’. कोलकात्याचे रस्ते गर्दीनं फुललेले असतात. लाल काठाची पांढरी साडी नेसलेल्या बायका एकमेकींना कुंकवानं रंगवतात.
कोलकात्त्यातील दुर्गापूजा. चुकवू नये असा अनुभव. चैतन्याच्या या आविष्काराचं साक्षीदार व्हायलाच हवं!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 6:36 PM