easy and simple ways to register for indian passport online
पासपोर्टसाठी 'असं' करा अप्लाय, 15 दिवसांमध्ये होईल काम! By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2019 3:08 PM1 / 8सध्या ऑनलाईनचा जमाना असल्याने अनेक गोष्टी सहज शक्य झाल्या आहेत. सोप्या पद्धतीने पासपोर्टसाठी अप्लाय करता येतं. ऑनलाईन रजिस्ट्रेशननंतर इंटरव्यू क्लिअर केल्यानंतर पासपोर्ट दिला जातो. लवकरात लवकर कोणत्याही समस्येविना पासपोर्ट हवा असल्यास काय करायचे हे जाणून घेऊया. 2 / 8पासपोर्ट काढण्यासाठी सर्वप्रथम पासपोर्टच्या अधिकृत वेबसाईटवर जाणून तुमचं नाव रजिस्टर करा. https://portal2.passportindia.gov.in/AppOnlineProject/welcomeLink या लिंकवर जाऊन 'new user' वर क्लिक करा. 3 / 8'new user' वर क्लिक केल्यानंतर User Registration दिसेल त्यामध्ये तुमचं नाव, जन्मतारीख, ई-मेल आयडी यासह विचारलेल्या प्रश्नांची माहिती द्या. 4 / 8वेबसाईटवर रजिस्टर केल्यानंतर तुमच्या एक युजर नेम आणि पासवर्ड येईलचा तपशील येईल. त्यानंतर त्याचा वापर करून लॉग इन करा. त्यानंतर त्यामध्ये 'Apply for fresh passport' चा एक पर्याय मिळेल. 'Apply for fresh passport' मध्ये एक फॉर्म समोर दिसेल तो फॉर्म ऑनलाईन भरू शकता अथवा डाऊनलोड करून ही भरता येतो. 5 / 8फॉर्म भरल्यानंतर डॉक्यूमेंट जमा करण्याचा पुढचा पर्याय दिसेल. त्यामुळे यासाठी लागणाऱ्या सर्व डॉक्यूमेंटच्या सॉफ्ट कॉपी आपल्या सिस्टममध्ये सेव्ह करा. त्यानंतर त्या अपलोड करा. पासपोर्टवर हवं असलेलं नावचं सर्व डॉक्यूमेंटवर आहे की नाही याची खात्री करा. जर नाव किंवा पत्ता वेगवेगळा असेल तर तुमचं पासपोर्ट अॅप्लिकेशन रद्द होण्याची शक्यता असते. 6 / 8फॉर्म आणि डॉक्यूमेंट सबमिट केल्यानंतर पासपोर्ट फी भरा. 1500 रूपये फी आहे. तत्काळ स्वरूपात पासपोर्ट मिळवायचा असेल तर त्यासाठी 3500 रूपये भरावे लागतात. पैसे भरल्यानंतर अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी पर्याय देण्यात येतो. येथे तुम्हाला जागेसोबतच तुमच्या सवडीनुसार वेळ निवडण्याचाही पर्याय देण्यात येतो. ठिकाण, वेळ निवडल्यानंतर तुमच्या फोनवर संबंधित मेसेज येतो. 7 / 8इंटरव्यूची अपॉइंटमेंट बुक केल्यानंतर बुकिंग स्लिप आणि तुम्हाला काय-काय डॉक्यूमेंट घेऊन जायचे आहेत. त्याची एक कॉपी प्रिंट करा. महत्त्वाचे सर्व डॉक्यूमेंट (ओरिजिनल आणि फोटोकॉपी) एका फाइलमध्येच ठेवा. इंटरव्यूला जाण्याआधी ही फाइल सोबत घेऊन जा. 8 / 8साधारण पद्धतीव्यतिरिक्त तत्काळ स्वरूपात पासपोर्ट तयार करण्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता. या सेवेअंतर्गत 10 दिवसांमध्येच पासपोर्ट तुम्हाला मिळणं शक्य होतं. यासाठी पासपोर्ट वेबसाईटवर 'Annexure F' हा फॉर्म डाउनलोड करून भरावा लागतो. सर्व आवश्यक माहिती भरल्यानंतर प्रत्येक डॉक्यूमेंट एखाद्या मोठ्या पोस्टवर असलेल्या सरकारी कर्मचाऱ्याकडून सही करणं गरजेचं असतं. याशिवाय तत्काळ पासपोर्ट तयार करणं अशक्य असतं. आणखी वाचा Subscribe to Notifications