शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कमी खर्चात 'या' 10 देशांमध्ये फिरणं भारतीयांच्या आवाक्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 8:21 PM

1 / 10
परदेशात फिरण्याची प्रत्येकालाच हौस असते, पण आर्थिक बाजूनं फिरणं प्रत्येकाला परवडणारं नसतं. परंतु असेही काही देश आहेत ज्यात भारतीय चलनाचं मूल्य चांगलं आहे. यूरोपमधला आइसलँड हा देश छोटा असला तरी पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. स्वार्तिफोस, ब्रिडाविक बीच, आस्कजा, स्कोगाफोस, ब्लू लगूनसारखी ठिकाणं इथे पाहण्यासारखी आहेत.
2 / 10
हंगेरी- हंगेरी देशही पर्यटकांच्या आवडीचं केंद्रस्थान आहे. हंगेरीत 1 रुपयाची किंमत 4.12 हंगेरियन फोर्निट्स (हंगेरी चलन) आहे. विशेष म्हणजे हंगेरी फिरण्यासह राहण्यासाठी चांगला देश आहे. कमी बजेटमध्ये तुम्ही इथे भरपूर फिरू शकता.
3 / 10
जपान- खानपानासाठी जपान फार प्रसिद्ध देश आहे. जपान पर्यटनासाठीही प्रसिद्ध आहे. भारताच्या रुपयाची किंमत जपानमध्ये 1.60 जपानी येन आहे. इथे तुम्ही नूडल्स, सुसी, मिस सूप, डंपलिंग्स, नॉल व्हेजेटेरियन मोमोस, टेस्टी फूडची चव चाखू शकता.
4 / 10
मंगोलिया- मंगोलियातही भारताच्या 1 रुपयाची किंमत 35.67 तुगरिक (मंगोलियन चलन) आहे. इथे तुम्ही जितके दिवस राहायचं आहेत तेवढे दिवस राहू शकता. मंगोलियात 500 ते 800 रुपयांमध्ये खाण्यापिण्यासह राहण्याची व्यवस्था होते.
5 / 10
कोस्टा रिका- कोस्टा रिका हा देश स्वर्गाहून कमी नाही. कोस्टा रिकात तुम्ही वॉटर गेम्सची मज्जा लुटू शकता. इथे 1 रुपयाची किंमत 8.15 रिकन कोलोन्सएवढी आहे. इथल्या चलनाला कोलोन म्हटलं जातं.
6 / 10
इंडोनेशिया- इंडोनेशिया हा देश हजारो द्वीप समूहांनी तयार झालेला आहे. इंडोनेशियातले समुद्र, मंदिर, जंगल आणि ज्वालामुखीसाठी प्रसिद्ध आहेत. इंडोनेशियाच्या 1 रुपयाची किंमत 0.0048 भारतीय चलनाएवढी आहे.
7 / 10
व्हिएतनाम- व्हिएतनाम हा देश समुद्र तट, नद्या, बौद्ध मठांसाठी परिचित आहे. इथे तुम्हाला कमी पैशात ताज्या बीअरचा पॅक रिचवता येणार आहेत. इथलं चलन डांग असून, 334.68 डांग मिळून 1 रुपया तयार होतो. विशेष म्हणजे या देशात फिरण्यासाठी भारतीय ऑनलाइन पद्धतीनं व्हिसा मिळवू शकतात.
8 / 10
श्रीलंका- श्रीलंका आणि भारतादरम्यान सांस्कृतिक संबंध आहेत. इथे भारतीय रुपयाची किंमत 2.30 श्रीलंकन रुपया आहे.
9 / 10
कंबोडिया- कंबोडिया या देशात तुम्हाला भारताची झलक पाहायला मिळते. कंबोडियात देशातलं सर्वात मोठं विष्णू मंदिर आहे.
10 / 10
नेपाळ- नेपाळमध्ये बाबर महल, पुजारी मठ, गोरखा मेमोरियल म्युझियम, पाटण म्युझियम, चितवन नॅशनल पार्कमध्ये फिरून तुम्ही सुट्ट्या एन्जॉय करू शकता. नेपाळमध्ये भारताच्या रुपयाची किंमत नेपाली चलनात 1.60 रुपयांएवढी आहे.