Famous Ganesh Temples to Visit in India During Ganesh Chaturthi
गणेशोत्सवादरम्यान भेट द्यावीच अशी भारतातील प्रसिद्ध गणपती मंदिरे, यात महाराष्ट्रातील प्रमुख चार By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 7:31 PM1 / 7सिद्धिविनायक मंदिर मुंबई : हे गणपतीला समर्पित असलेल्या सर्वात लोकप्रिय मंदिरांपैकी एक आहे. या गणपतीला नवसाला पावणारा गणपतीदेखील म्हणतात. 1801 मध्ये बांधलेले हे भव्य अन् अनेक सेलिब्रिटींचे आवडते मंदिर आहे.2 / 7दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर पुणे : पुण्यातील या गणपती मंदिरात 7.5 फूट उंच आणि 4 फूट रुंद गणपतीची मूर्ती आहे. दूरवरून लोक दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शनासाठी येतात.3 / 7विघ्नहर मंदिर ओझर : पुण्यापासून 85 किलोमीटर अंतरावर कुकडी नदीच्या काठावर हे गणपती मंदिर आहे. मंदिराची रचना विस्तृत, सुशोभित प्रवेशद्वार, प्रशस्त अंगण आणि सर्वत्र शिल्प आणि भित्तिचित्र आहे.4 / 7गणपतीपुळे मंदिर रत्नागिरी : मुंबईपासून 350 किलोमीटर अंतरावर कोकणातील हे 400 वर्षे जुने पश्चिमाभिमुख लंबोदर मंदिर आहे. या तटीय मंदिरातील गणपतीची मूर्ती पश्चिमेकडील रक्षणासाठी स्वतः प्रकट झाली असे मानले जाते.5 / 7उची पिल्लयार मंदिर तिरुचिरापल्ली : त्रिची येथील रॉकफोर्टच्या शिखरावर असलेले हे मंदिर विजयनगरच्या राजघराण्यांनी बांधले होते. हे मंदिर येथील वास्तुकला आणि डोंगरमाथ्यावरील कावेरी नदीच्या सुंदर दृश्यासाठी प्रसिद्ध आहे.6 / 7कनिपकम विनायक मंदिर चित्तूर आंध्र प्रदेशातील : हे 1000 वर्षांहून अधिक जुने आहे, चित्तूर जिल्ह्यातील कनिपाकम गावात चोल राजा कुलोथुंगा चोल याने बांधलेले एक अतिशय प्रसिद्ध मंदिर आहे.7 / 7वर नमूद केलेल्या मंदिरांव्यतिरिक्त, रणथंबोर गणेश मंदिर, वरसिद्धी विनयागर मंदिर चेन्नई, कलामासेरी महागणपती मंदिर केरळ, गणेश टोक मंदिर गंगटोक, राजस्थान आणि जयपूर येथेही भारतातील काही प्रसिद्ध गणपती मंदिरे आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications