शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

केरळमध्ये फिरण्यासाठी 'ही' आहेत सर्वात सुंदर ठिकाणं, सुट्टीच्या दिवसात करू शकता प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2023 4:52 PM

1 / 6
केरळ हे अतिशय सुंदर राज्य आहे. येथे एकापेक्षा एक पर्यटन स्थळे आहेत. येथे अनेकदा पर्यटकांची गर्दी असते. केरळला देवभूमी म्हणूनही ओळखले जाते. तुम्ही याठिकाणी कौटुंबिक सहलीसाठी किंवा हनिमूनसाठी देखील जाऊ शकता. तर जाणून घ्या, केरळमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळांबद्दल...
2 / 6
जर तुम्ही निसर्ग प्रेमी असाल तर मुन्नार तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय असू शकतो. येथील हिल स्टेशनच्या सौंदर्याने तुम्ही मंत्रमुग्ध व्हाल. मुन्नार हे चहाच्या बागांसाठीही प्रसिद्ध आहे. तसेच, येथील इको पॉइंटवर तुम्ही अनेक प्रकारच्या अॅक्टिव्हिटिजचा आनंद घेऊ शकता.
3 / 6
वर्कला हे केरळमधील प्रसिद्ध ठिकाण आहे. येथील बीच आणि दूरपर्यंत पसरलेल्या समुद्राचे सौंदर्य तुमचे मन जिंकेल. येथे पर्वत आणि समुद्राची विलक्षण दृश्ये पाहता येतात. जर तुम्ही केरळला भेटायला गेलात तर वर्कलाला जायला विसरू नका.
4 / 6
फोर्ट कोचीला ओल्ड कोची किंवा वेस्ट कोची म्हणूनही ओळखले जाते. तुम्ही याठिकाणी पायी फिरू शकता. येथे असलेला डच पॅलेस खूप प्रसिद्ध आहे. याशिवाय, सांताक्रूझ कॅथेड्रल बॅसिलिका, इंडो-पोर्तुगीज म्युझियम इत्यादी पाहू शकता.
5 / 6
वायनाड हे अतिशय सुंदर पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. ऐतिहासिक लेणी, धबधबे आणि अनेक पर्यटन स्थळे येथे आहेत. येथे तुम्हाला राहण्यासाठी रुम देखील मिळतील. तुम्ही येथे ट्रेकिंगसाठी जाऊ शकता.
6 / 6
अलेप्पी हे केरळमधील सर्वात लोकप्रिय ठिकाणांपैकी एक आहे. येथे वर्षभर पर्यटकांची गर्दी असते. व्हॉलीबॉल आणि सर्फिंगसारख्या अॅक्टिव्हिटीजसाठी हा बीच एक योग्य पर्याय मानला जातो.
टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सKeralaकेरळ