शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

उन्हाळ्यात 'या' ऑफबिट डेस्टिनेशन्स भेट देऊन घ्या ठंडा ठंडा कूल कूलचा अनुभव!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2019 11:34 AM

1 / 7
उन्हाळा सुरू होताच आणि उकाड्यामुळे जीवाची लाही-लाही होत असताना अनेकांना आठवण येते ती बर्फाच्या झाकल्या गेलेल्या डोंगरांची आणि हिरव्यागार जंगलांची. अनेकजण उन्हाळ्यात अशाच ठिकाणी फिरायला जाण्याचा विचार करतात. त्यामुळे आम्ही अशा लोकांसाठी काही खास पर्याय घेऊन आलो आहोत. हे पर्याय आहेत हिमाचल प्रदेशमधील.
2 / 7
नग्गर - हिमाचलमधील नग्गर या छोट्याश्या पर्यटन स्थळाला इतिहास आणि निसर्गाचा संगम म्हटलं जातं. येथील घरे १५व्या शतकातील वास्तुकलेवरून प्रेरित आहेत. तसेच येथील निसर्ग सौंदर्य तुम्हाला एक वेगळाच अनुभव देतो.
3 / 7
शोजा - शोजा हे सुद्धा आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी चांगलंच लोकप्रिय ठिकाण आहे. येथील शांत वातावरण तुम्हाला वेगळ्याच विश्वात घेऊन जाण्याचा अनुभव देईल. त्यामुळे उन्हाळ्यात इथे एकदा नक्की भेट द्या. (Image Credit : Tripoto)
4 / 7
खज्जियार - खज्जियार या ठिकाणाला केवळ हिमाचलमधील नाही तर भारतातील सर्वात चांगलं पर्यटन स्थळ मानलं जातं. येथील बर्फाची डोंगरं पर्यटकांना नेहमीच आपल्याकडे आकर्षित करतात. कपल्ससाठी हे ठिकाण परफेक्ट मानलं जातं. (Image Credit : Jogindernagar.com)
5 / 7
अंद्रेटा - हिमाचलमधील प्रसिद्ध चहाच्या बागांपासून काही किमी अंतरावर असलेंल अंद्रेटा हे एक छोटं गाव आहे. येथील नैसर्गिक सौंदर्य शांत आणि मनाला आनंद देणारं आहे. तुमचा सगळा ताण तुम्ही इथे आल्यावर विसरल्याशिवाय राहणार नाही. (Image Credit : NBT)
6 / 7
अंद्रेटा - हिमाचलमधील प्रसिद्ध चहाच्या बागांपासून काही किमी अंतरावर असलेंल अंद्रेटा हे एक छोटं गाव आहे. येथील नैसर्गिक सौंदर्य शांत आणि मनाला आनंद देणारं आहे. तुमचा सगळा ताण तुम्ही इथे आल्यावर विसरल्याशिवाय राहणार नाही. (Image Credit : NBT)
7 / 7
चिटकुल - भारत आणि चीनच्या सीमेजवळ असलेलं हे छोटं पहाडी गाव आहे. त्यामुळे येथील नैसर्गिक सौंदर्य कसं असेल हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. येथील लाडकांडी घरे बघण्यासारखी आहेत. (Image Credit : NBT)
टॅग्स :Himachal Pradeshहिमाचल प्रदेशTravel Tipsट्रॅव्हल टिप्सtourismपर्यटनSummer Specialसमर स्पेशल