शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पहिल्यांदाच वैष्णोदेवीला जाताय? जाणून घ्या खास गोष्टी!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2018 5:08 PM

1 / 7
अनेकजण वैष्णोदेवीला जाण्यासाठी कित्येत दिवसांपासून प्लॅनिंग करत असतात. पण तेथील फार माहिती नसल्याने अनेकांना प्रवासादरम्यान वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. तुम्हीही वैष्णोदेवीला पहिल्यांदाच जाणार असाल तर काही खास गोष्टी जाणून घेणे गरजेचे आहे.
2 / 7
वैष्णो देवी मंदिर यात्रेला देशातील सर्वात पवित्र आणि कठिण तीर्थ यात्रा मानली जाते. कारण हे मंदिर जम्मू-काश्मीरमधील त्रिकुटाच्या डोंगरांमध्ये एका गुहेत आहे. या मंदिरात पोहोचण्यासाठी १२ किमीची कठिण चढाई करावी लागते.
3 / 7
वैष्णो देवी हे तीर्थक्षेत्र समुद्र सपाटीपासून ५ हजार ३०० फूट उंचीवर आहे आणि बेस कॅम्पपासून मंदिरात जाण्याचा प्रवास १२ किमीचा आहे. तुम्ही हा प्रवास घोड्यांच्या मदतीनेही करु शकता. तसेच इथे हेलिकॉप्टर सेवाही सुरु असते. किंवा हा प्रवास तुम्ही पायी चालूनही करु शकता.
4 / 7
जम्मूचं एक छोटं शहर कटरा वैष्णो देवीच्या बेस कॅम्प आहे. हे जम्मूपासून ५० किमी दूर आहे. यात्रा सुरु करण्याआधी रजिस्ट्रेशन करने गरजेचे आहे. कारण रजिस्ट्रेशनच्या स्लीपच्या आधारावरच तुम्हाला मंदिरात दर्शन करण्याची संधी मिळते. कटरा ते भवन(मंदिर) दरम्यान अनेक पॉइंट्स आहेत. ज्यात बाणगंगा, चारपादुका, इंद्रप्रस्था, अर्धकुवांरी, गर्भजून, हिमकोटी, सांझी छत आणि भैरो मंदिर यांचा समावेश आहे.
5 / 7
जम्मूचं राणीबाग एअरपोर्ट वैष्णो देवीला जाण्यासाठी जवळील एअरपोर्ट आहे. जम्मूहून रस्त्यामार्गेही वैष्णो देवीचा बेस कॅम्प कटराला पोहोचता येतं. जे ५० किमी अंतरावर आहे. जम्मू ते कटरा दरम्यान बस आणि टॅक्सी सहर उपलब्ध होते.
6 / 7
जवळील रेल्वे स्टेशन जम्मू आणि कटरा आहे. देशभरातील मुख्य शहरांसोबत जम्मू रेल्वे मार्ग जुळला आहे. कटरा येथेही एक रेल्वे स्टेशन तयार करण्यात आलं आहे. दिल्लीसह आणखीही काही शहरांमधून इथे थेट रेल्वे येतात.
7 / 7
वैष्णो देवी यात्रा तशी वर्षभर सुरु असते आणि इथेही कधीही जाता येऊ शकतं. पण मे ते जून आणि नवरात्रीमध्ये इथे भाविकांची फार गर्दी असते. तसेच जुलै ते ऑगस्ट पावसात इथे प्रवास करु नये.
टॅग्स :Travelप्रवासJammu Kashmirजम्मू-काश्मीर