शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Ganesh Chaturthi 2018 : भारतातील 'या' प्रसिद्ध गणेश मंदिरांना नक्की भेट द्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2018 2:56 PM

1 / 7
लाडक्या बाप्पाच्या आगमनाने सर्वत्र आनंदाचे, उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. गणपती हे अनेक भाविकांचं श्रद्धास्थान आहे. संपूर्ण देशभरात प्राचीन आणि वैशिष्टपूर्ण गणपतीची मंदिरं आढळून येतात. या मंदिराबाबत जाणून घेऊया.
2 / 7
श्री सिद्धिविनायक म्हणजे मुंबईतील गणेश भक्तांचे अतिशय श्रद्धेचे स्थान. मुंबईतीलच नव्हे तर संपूर्ण भारतातून आणि परदेशांतूनही या मंदिरात भक्तांची सतत रिघ लागलेली असते. या मंदिरात गणपतीची उजव्या सोंडेची चतुर्भूज मूर्ती आहे.
3 / 7
पुण्याचा अधिपती दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी अनेक भक्तगण येत असतात. मनोकामना पुर्ण करणाऱ्या गणपतीमध्ये या गणपतीचे नाव अग्रक्रमाने घेतलं जातं. भव्य दिव्य आरास हे गणपतीचे वैशिष्टय आहे.
4 / 7
राजस्थानमधील रणथंभौर गणेश मंदिर हे जवळपास 100 वर्ष जुनं आहे. गणपतीची तीन डोळ्यांची शेंदूर लावलेली प्रतिमा हे या मंदिराचं वैशिष्ट्य आहे. रणथंभौरमधील लोकांकडे एखादा समारंभ असेल तर त्याची निमंत्रण पत्रिका ही गणपतीच्या समोर सर्वप्रथम ठेवली जाते.
5 / 7
आंध्र प्रदेशच्या चित्तूर जिल्ह्यामध्ये कनिपकम हे मंदिर आहे. या मंदिरात असलेल्या गणपतीचा आकार दिवसेंदिवस वाढत जात असल्याचं येथील लोकांचं म्हणणं आहे. अनेक भाविक या मंदिराला भेट देत असतात.
6 / 7
मोती डूंगरी गणेश मंदिर जयपूरमधील काही प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. हे मंदिर सातशे ते आठशे वर्ष जुनं असल्याचा येथील लोकांकडून दावा करण्यात येतो. गणेश चतुर्थीच्या दिवशी या मंदिरात भाविकांची खूप गर्दी असते.
7 / 7
मधूर महागणपती मंदीर हे केरळमध्ये आहे. सुरुवातीला हे शंकराचं मंदिर होतं. मात्र पुजाऱ्याच्या मुलाने मंदिराच्या भिंतीवर गणपतीची प्रतिमा तयार केल्यानंतर हे गणपतीचं मंदिर झाल्याचं येथील लोकांनी म्हटलं आहे.
टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८Ganeshotsavगणेशोत्सव