Ganesh Chaturthi 2019 : Most famous ancient ganesha temples india
Ganesh Chaturthi 2019 : 'ही' आहेत भारतातील प्रसिद्ध गणेश मंदिरं; नक्की भेट द्या! By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2019 12:53 PM1 / 7सध्या राज्यभरात गणरायाचे आगमन सोहळे उत्साहात पार पडत असून गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणपती हे अनेक भाविकांचं श्रद्धास्थान आहे. कोणत्याही कामाची सुरुवात करण्याआधी विघ्नहर्त्याची पूजा करण्यात येते. संपूर्ण देशभरात प्राचीन आणि वैशिष्टपूर्ण गणपतीची अनेक मंदिरं आहेत. जाणून घेऊया या मंदिराबाबत... 2 / 7श्री सिद्धिविनायक म्हणजे मुंबईतील गणेश भक्तांचे अतिशय श्रद्धेचे स्थान. मुंबईतीलच नव्हे तर संपूर्ण भारतातून आणि परदेशांतूनही या मंदिरात भक्तांची सतत रिघ लागलेली असते. या मंदिरात गणपतीची उजव्या सोंडेची चतुर्भूज मूर्ती आहे.3 / 7पुण्याचा अधिपती दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी अनेक भक्तगण येत असतात. मनोकामना पुर्ण करणाऱ्या गणपतीमध्ये या गणपतीचे नाव अग्रक्रमाने घेतलं जातं. भव्य दिव्य आरास हे गणपतीचे वैशिष्टय आहे.4 / 7राजस्थानमधील रणथंभौर गणेश मंदिर हे जवळपास 100 वर्ष जुनं आहे. गणपतीची तीन डोळ्यांची शेंदूर लावलेली प्रतिमा हे या मंदिराचं वैशिष्ट्य आहे. रणथंभौरमधील लोकांकडे एखादा समारंभ असेल तर त्याची निमंत्रण पत्रिका ही गणपतीच्या समोर सर्वप्रथम ठेवली जाते.5 / 7आंध्र प्रदेशच्या चित्तूर जिल्ह्यामध्ये कनिपकम हे मंदिर आहे. या मंदिरात असलेल्या गणपतीचा आकार दिवसेंदिवस वाढत जात असल्याचं येथील लोकांचं म्हणणं आहे. अनेक भाविक या मंदिराला भेट देत असतात.6 / 7मोती डूंगरी गणेश मंदिर जयपूरमधील काही प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. हे मंदिर सातशे ते आठशे वर्ष जुनं असल्याचा येथील लोकांकडून दावा करण्यात येतो. गणेश चतुर्थीच्या दिवशी या मंदिरात भाविकांची खूप गर्दी असते.7 / 7मधूर महागणपती मंदीर हे केरळमध्ये आहे. सुरुवातीला हे शंकराचं मंदिर होतं. मात्र पुजाऱ्याच्या मुलाने मंदिराच्या भिंतीवर गणपतीची प्रतिमा तयार केल्यानंतर हे गणपतीचं मंदिर झाल्याचं येथील लोकांनी म्हटलं आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications