शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अरे व्वा! आता पुन्हा धावणार भारतीय रेल्वेची luxuri ट्रेन; ५ लाख रूपये भाडं अन्...; जाणून घ्या खासियत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 5:41 PM

1 / 8
भारतीय रेल्वेची लग्जरीअस ट्रेन गोल्डन चॅरिएट पुन्हा एकदा रूळांवर धावणार आहे. दक्षिण भारताची सफर घडवणारी हे ट्रेन १४ मार्चपासून ग्राहकांच्या सेवेसाठी पुन्हा सुरू झाली. द प्राईड ऑफ कर्नाटक नावानं प्रसिद्ध असलेली गोल्डन चॅरिएट ट्रेन १४ मार्चपासून ६ रात्री आणि सात दिवसांसाठी यशवंतपूर बँगलुरू रेल्वे स्टेशनवरून सुरू झाली.
2 / 8
आयआरसीटीसीनं दिलेल्या माहितीनुसार गोल्डन चॅरिएट बँगलुरूपासून बांदीपूर नॅशनल पार्क, मैसूर, हॅलेबिड, चिकमंगलुरू, हम्पीचा प्रवास करत सात दिवसांनी परतणार आहे. या ट्रेनच्या प्रवासाचा आनंद घेण्यासाठी दोन प्रकारच्या योजना आखण्यात येणार आहेत.
3 / 8
जर तुम्ही ६ रात्री आणि ७ दिवसांची प्लॅन घेऊ इच्छित नसाल तर तुम्ही ३ रात्रींचे पॅकेजसुद्धा घेऊ शकता. ज्यात तुम्हाला बँगलुरू, म्हैसुर, हम्पी, महाबलीपुरम फिरण्याची संधी मिळू शकते.
4 / 8
प्राईड ऑफ कर्नाटक आणि ज्वेल ऑफ साऊथ चे हे दोन पॅकेज आहेत. ज्याचं भाडंसुद्धा वेगवेगळं आहे. द ज्वेल्स ऑफ साऊथ इंडीयाची सफर २१ मार्चला सुरू होणार आहे. तर या ट्रेनचं बुकिंग करण्यासाठी तुम्ही अधिकृत वेबसाईट goldenchariot.org वर जाऊन बुकिंग करू शकता.
5 / 8
ही ट्रेन कोणत्याही फाईव्ह स्टार हॉटेलला टक्कर देईल अशी आहे.
6 / 8
या ट्रेनमध्ये जीम, स्पा, गाद्या, फर्नीचर, आलिशान खोल्या, बाथरूम असून यांची रचना खास डिजायर्नसकडून करण्यात आली आहे.
7 / 8
दरम्यान ही शाही ट्रेन २००८मध्ये कर्नाटक राज्य पर्यटन विकास पालिकेकडून सुरू करण्यात आली होती. त्यानंतर या ट्रेनटी सुत्र आयआरसीटीसीकडे सोपावण्यात आली.
8 / 8
दरम्यान ही शाही ट्रेन २००८मध्ये कर्नाटक राज्य पर्यटन विकास पालिकेकडून सुरू करण्यात आली होती. त्यानंतर या ट्रेनटी सुत्र आयआरसीटीसीकडे सोपावण्यात आली.
टॅग्स :IRCTCआयआरसीटीसीIndian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वेKarnatakकर्नाटक