Have you ever watched a movie sitting in the bathtub in the theater?
थिएटरमधल्या बाथटबमध्ये बसून कधी चित्रपट पाहिलाय काय? By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2019 7:03 PM1 / 6थिएटरमध्ये चित्रपट पाहण्याची मज्जाच काही और असते. हॉलच्या आत बाथटबमध्ये बसून सिनेमा पाहण्याची मजा काही वेगळीच असते, असेच काही थिएटर आहेत, ज्यात आपल्याला बाथटबमध्ये बसून चित्रपट पाहता येतात.2 / 6ग्रीसमधलं ओलिंपिया थिएटरचं निर्माण 1910मध्ये करण्यात आलं आहे. इथे आपल्याला एक पर्सनल बेड मिळतो. ज्यावर झोपून चित्रपट पाहता येतो. 3 / 6मास्कोतलं आयकिया बेडरूम सिनेमाही प्रेक्षकांच्या आवडीचा आहे. या थिएटरमध्ये स्लीपर, कंबल आणि टेबल लँपसारख्या वस्तू मिळाल्या. जे तुम्हाला बेडरूमचं वातावरण मिळतो. 4 / 6लंडनमधलं नॉटिंग हिलमधलं इलेक्ट्रिक सिनेमा प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. या थिएटरमधल्या पहिल्या रांगेत बेड लावण्यात आले आहेत. सोफ्याच्या मधोमध टेबल लँपही बसवण्यात आले आहेत. 5 / 6इंडोनेशिया वेल्वेट क्लासमधलं सिनेमा हॉल जकार्तामध्ये आहे. खाण्या-पिण्याचं सामान ठेवण्यासाठी एक मखमली टेबलसुद्धा आहे. 6 / 6लंडनमधल्या हॉट टब सिनेमा हॉलही विशेष आहे. इथं पाण्यानं भरलेल्या टबमध्ये मित्रांबरोबर बसून चित्रपट पाहता येतो. आणखी वाचा Subscribe to Notifications