शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ख्रिसमस-नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी हिमाचलला जाताय? 'या' 5 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 12:40 PM

1 / 7
शिमला : हिमाचल प्रदेशात हिमवर्षावाचा हंगाम आहे. ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी (Christmas and New Year) मोठ्या प्रमाणात पर्यटक येण्याची शक्यता आहे. ख्रिसमस ते नववर्षापर्यंत दोन लाखांहून अधिक पर्यटक हिमाचल प्रदेशात येण्याची शक्यता आहे. जर व्हाइट ख्रिसमस म्हणजेच बर्फ असेल तर आकडा जास्त असू शकतो. पोलिसांनी शिमल्यातच (Shimla) एक लाख पर्यटक वाहनांच्या एंट्रीची आशा व्यक्त केली असून शहरासाठी एक योजना तयार केली आहे.
2 / 7
दरम्यान, हिमाचल प्रदेशात ख्रिसमस आणि नवीन वर्ष साजरे करण्यासाठी येणार्‍या पर्यटकांना त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे हिमाचल प्रदेशात दरवर्षी ख्रिसमस आणि नवीन वर्ष साजरे करण्यासाठी येणारे पर्यटक वाहनांमध्येच रात्री घालवतात. सर्वात मोठी समस्या मनालीमध्ये आहे. मनालीमध्ये पर्यटकांना हॉटेल्स मिळत नसल्याचे गेल्या दोन वर्षांत येथे दिसून आले आहे. अशा परिस्थितीत तुम्ही मनालीला ख्रिसमस आणि नवीन वर्ष साजरे करण्यासाठी येत असाल तर हॉटेल बुकिंगशिवाय येऊ नका.
3 / 7
हिमाचल प्रदेशच्या शिमला आणि मनालीमध्ये पार्किंगची समस्या खूप आहे. शिमल्यात सर्वसामान्यांना रस्त्याच्या कडेला गाड्या उभ्या कराव्या लागतात. पर्यटकांच्या अडचणीही वाढतात. अशा परिस्थितीत पर्यटकांनी हॉटेल बुक करताना हॉटेलमध्ये पार्किंग आहे की, नाही याची खातरजमा करावी. जवळपास पार्किंग असलेले हॉटेल बुक करण्याचा प्रयत्न करा.
4 / 7
ख्रिसमस आणि नवीन वर्ष साजरे करण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक शिमला आणि मनाली येथे येतात. यावेळी तरुण पर्यटक दारू पिऊन गोंधळ घालत असल्याचे अनेकदा दिसून येते. अशा परिस्थितीत गोंधळ घालणाऱ्या पर्यटकाला पोलीस अटक करू शकतात आणि त्याला तुरुंगात जावे लागू शकते. गेल्या वर्षी कुल्लू पोलिसांचा एक बोर्डही व्हायरल झाला होता, ज्यामध्ये असे लिहिले होते की, कुल्लू येथील तुरुंगात खूप थंडी आहे आणि अशा परिस्थितीत शिस्त पाळावी.
5 / 7
शिमला आणि मनालीमधील बहुतेक हॉटेल्स मॉल रोडच्या आसपास आहेत. येथे पर्यटकांची सर्वाधिक गर्दी असते. शिमल्यातील मॉल रोडजवळूनही वाहने जात नाहीत, ही सर्वात मोठी समस्या आहे. मनालीमध्येही मॉल रोडजवळ पार्किंगची समस्या आहे. अशा परिस्थितीत, शहरापासून 4-5 किमी अंतरावर हॉटेल शोधण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला समस्यांना सामोरे जावे लागणार नाही.
6 / 7
हिमाचलमध्ये बर्फवृष्टीचा हंगाम आहे आणि त्यासोबत ख्रिसमस आणि नवीन वर्ष देखील येत आहे, त्यामुळे तुम्ही मनालीलाही येत असाल तर अगोदर म्हणजे दोन ते तीन तास आधी घरातून बाहेर पडा. दरम्यान, पावसाळ्यात चंडीगड मनाली हायवे पंडोह आणि मनालीजवळ काही ठिकाणी खराब झाला आहे. अशा परिस्थितीत दिल्ली आणि चंदीगडहून मनालीला दोन ते तीन तास अगोदर जाण्याचा प्रयत्न करा. मंडीच्या पंडोहजवळ चौपदरी रस्ता खराब आहे. येथील लिंक रोडचे रुंदीकरण करण्यात आले आहे. मात्र, येथे वाहतूक कोंडी होते. यामुळे वेळ वाया जातो. पांडोहपासून थोडे पुढे गेल्यावर हनोगीच्या आधी रस्ता खचला असून येथेही वाहतूक कोंडी होते. त्याचप्रमाणे रायसन आणि मनालीसमोर वाहतूक कोंडीची समस्या आहे.
7 / 7

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सHimachal Pradeshहिमाचल प्रदेशJara hatkeजरा हटके