बर्फवृष्टीनं बहरलं हिमाचलचं सौंदर्य By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 11:38 AM
1 / 6 हिमाचल प्रदेशच्या अनेक जिल्ह्यांमध्ये हिमवृष्टी झालीय. त्यामुळे निसर्ग सौंदर्य आणखी फुलून दिसतंय. 2 / 6 हिमाचल प्रदेशातल्या कुल्लू, शिमल्यामध्ये आज सकाळी मोठी हिमवृष्टी झाली. 3 / 6 हिमवृष्टीमुळे राज्यातील तापमानात मोठी घट झालीय. अनेक भागांमधील तापमान शून्य अंश सेल्सिअसच्या खाली गेलंय. 4 / 6 मनालीत आज -1.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीय. तर काल्पा, कुर्फी, केयलाँगमधलं तापमानही शून्याच्या खाली गेलंय. 5 / 6 संपूर्ण राज्यांवर बर्फाची चादर पाहायला मिळतेय. त्यामुळे पर्यटकांची पावलं हिमाचलकडे वळू लागली आहेत. 6 / 6 यंदाही शिमला, कुल्लू, मनालीला पर्यटकांची सर्वाधिक पसंती मिळतेय. आणखी वाचा