Here are five toy trains in India making your journey unforgettable
या आहेत तुमचा प्रवास अविस्मरणीय बनवणाऱ्या भारतातील पाच टॉय ट्रेन By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2018 10:33 PM1 / 6हिरव्यागार डोंगरदऱ्यातून धुरांच्या रेषा हवेत सोडत जाणाऱ्या झुकझुक गाडीतून प्रवास करणे कुणालाही आवडते. अशाच ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या आणि नयनरम्य परिसरातून जाणाऱ्या टॉय ट्रेन भारतात आहेत. 2 / 6निलगिरी माऊंटन रेल्वे - निलगिरी माऊंटन रेल्वे तामिळनाडूमधील निलगिरी पर्वतामधील मेट्टुपालियम ते उटीदरम्यान धावते. ताशी अवघ्या 16 किमी वेगाने धावणाऱ्या या ट्रेनचा भारतातील सर्वात संथ रेल्वे असा आहे. 3 / 6दार्जिलिंग हिमालयन रेल्वे - दार्जिलिंग हिमालयन रेल्वे ही न्यू जलपैगुडी ते दार्जिलिंग दरम्यान धावते. या रेल्वे मार्गाचा समावेश जागतिक वारशामध्ये करण्यात आला आहे. 4 / 6कालका-सिमला टॉय ट्रेन - बर्फाच्छादित पर्वतामधून जाणाऱ्या कालका-सिमला टॉय ट्रेनमधून प्रवास करणे हा एक अविस्मरणीय अनुभव असतो. या रेल्वेमार्गाची सुरुवात 1903 साली झाली होती. 5 / 6नेरळ-माथेरान रेल्वे - महाराष्ट्रातील नेरळ येथून माथेरान या हिलस्टेशनपर्यंत जाणारी ही रेल्वेही वैशिष्ट्यपूर्ण आहे. या रेल्वेमार्गावर 21 पूल आणि 221 छोटीमोठी वळणे आहेत. 6 / 6कांग्रा व्हॅली रेल्वे - कांग्रा व्हॅली रेल्वेमार्गाचा भारतातील वारसास्थळामध्ये समावेश होतो. ही रेल्वे नॅरो गेज मार्गावरून पठाणकोट ते जोगिंदरनगरदरम्यान धावते. आणखी वाचा Subscribe to Notifications