holiday destinations in india at cheap rates
'ही' आहेत 'दहा हजारी' पर्यटनस्थळं By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2018 4:01 PM1 / 6सध्या सुट्ट्यांचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे तुम्ही फिरायला जायचा विचार करत असाल. मात्र तुमच्या फिरण्याच्या प्लानमध्ये बजेटचा अडथळा असेल, तर आम्ही तुम्हाला फिरण्यासाठी स्वस्त आणि मस्त पर्याय देत आहोत. या ठिकाणी तुम्ही अवघ्या दहा हजारात फिरुन येऊ शकता.2 / 6सर्वात पहिलं ठिकाण आहे ओरछा. मध्य प्रदेशात बेतवा नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं ओरछा एक शाही शहर आहे. या भागातील मंदिरं आणि महाल अतिशय प्रसिद्ध आहेत. राम राजा मंदिर, ओरछा किल्ला, जहागीर महाल, चतुर्भज मंदिर, राजा महाल अशी अनेक पर्यटनस्थळं या ठिकाणी आहेत. 3 / 6नितांत सुंदर निसर्ग पाहायचं असेल तर हिमाचल प्रदेशातल्या डलहौसीला भेट द्यायला हवी. या भागात 2 रात्र 3 दिवस वास्तव्य करण्यासाठी एका व्यक्तीला 10 हजार रुपये खर्च येतो. ब्रिटिश काळातील अधिकारी डलहौसीला स्कॉटलंड म्हणायचे. यावरुनच इथल्या निसर्ग सौंदयाची कल्पना करता येऊ शकेल. 4 / 6राजस्थान कायमच पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिलं आहे. माऊंट अबूला तर वर्षभर पर्यटकांची वर्षभर गर्दी असते. इथलं दिलवाडा मंदिर पर्यटकांचं आवडतं पर्यटनस्थळ आहे. 5 / 6उत्तराखंडमधील व्हॅली ऑफ फ्लॉवर हादेखील पर्यटनासाठी चांगला पर्याय आहे. याठिकाणी विविध प्रकारची फुलं पाहायला मिळतात. फुलांचं सौंदर्य डोळ्यात साठवून घ्यायचं असेल, तर या ठिकाणाला नक्की भेट द्या. 6 / 6महाराष्ट्राचा शेजारी असणाऱ्या गोव्यातदेखील वर्षभर पर्यटकांची गर्दी असते. सुंदर समुद्र किनारे, पोर्तुगीजांनी उभारलेली चर्च पाहण्यासाठी तुम्ही गोव्याला भेट देऊ शकता. आणखी वाचा Subscribe to Notifications