शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

शॉपिंगची आवड असेल तर 'या' ठिकाणांना नक्की भेट द्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2019 4:26 PM

1 / 7
वाचन, गायन, नृत्य याची जशी आवड असते तशीच काही जणांना शॉपिंगची देखील आवड असते. शॉपिंगसाठी कितीही फेरफटका मारावा लागला तरी त्यांना कंटाळा येत नाही. भारतात ही खास शॉपिंगसाठी प्रसिद्ध अशी अनेक ठिकाणं आहेत. अशाच काही ठिकाणांबाबत जाणून घेऊया.
2 / 7
जयपूर हे राजस्थानमधील अत्यंत लोकप्रिय ठिकाण आहे. जयपूरचे कपडे खूप जास्त प्रसिद्ध असल्याने दूर दूर वरून लोक शॉपिंगसाठी खास तेथे येत असतात. जयपूरची गोल्ड आणि सिल्व्हर ज्वेलरीही आकर्षक असते.
3 / 7
काश्मीरमध्ये फिरायला जायचा प्लॅन करत असाल तर शॉपिंगची एक वेगळी लिस्ट तयार करा. काश्मीरमध्ये लाकडावर करण्यात आलेले कोरीवकाम, पेंटिंग्स, ज्वेलरी, चहा आणि शाल अशा अनेक गोष्टी प्रसिद्ध आहेत. त्या वस्तूंची खरेदी केल्यास त्या घराची शोभा वाढवण्यास मदत करतील.
4 / 7
चेन्नई बीच आणि मंदिरांसाठी लोकप्रिय आहे. कांचीपूरम सिल्क मटेरियल, कपडे, साऊथ इंडियन ज्वेलरी प्रसिद्ध असल्याने त्या वस्तू आवर्जून खरेदी करा. चेन्नईला अनेक पर्यटक भेट देत असतात.
5 / 7
गोवा हे अत्यंत लोकप्रिय ठिकाण असून परदेशी पर्यटक भेट देत असतात. गोव्याला फिरण्यासोबतच शॉपिंगची मजाही घेता येते. गोव्यात मिळणाऱ्या अ‍ॅक्सेसरीज आणि हँडलम प्रसिद्ध आहेत.
6 / 7
लखनऊ अत्यंत सुंदर असल्याने या ठिकाणाला अनेक जण आवर्जुन भेट देत असतात. लखनऊची चिकनकारी लोकप्रिय असल्याने त्याची खरेदी नक्की करा.
7 / 7
मैसूर म्हटलं की सर्वप्रथम चंदनाची आठवण होते. चंदनासोबतच मैसूरमध्ये विविध मिठाई प्रसिद्ध आहे. मैसूरमध्ये सिल्क मटोरियल, मसाले आणि पेंटींगची खरेदी करू शकता.
टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सgoaगोवाJammu Kashmirजम्मू-काश्मीरChennaiचेन्नई