Intresting facts about mussoorie hill station in Uttarakhand
निसर्गसौंदर्यासोबतच 'डोंगरांची राणी' म्हणूनही प्रसिद्ध आहे मसूरी! By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2019 1:29 PM1 / 11तुम्ही उत्तराखंड फिरण्यासाठी गेलात आणि तुम्ही मसूरी नाही पाहिलतं तर तुम्ही काहीच नाही पाहिलं... मसूरी म्हणजे उत्तराखंडमधील देहरादून शहरापासून जवळपास 33 किलोमीटर अतंरावर वसलेलं एक सुंदर शहर. 2 / 11मसूरी शहराला डोगरांची राणी असंही म्हटंल जातं. हिवाळ्यामध्ये पूर्ण मसूरीवर बर्फाची चादर पांघरलेली असते. अनेक पर्यटक येथे बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी येत असतात. डोंगरदऱ्यांमध्ये वसलेलं हे शहर अत्यंत छोटं असलं तरी सुंदर आणि आकर्षक आहे. मसूरी या शहराला गंगोत्रीचं प्रवेशद्वारही म्हटलं जातं. 3 / 11देहरादूकडून मसूरीला जाण्यासाठी असलेला रस्ता डोंगर पोखरून तयार केलेला आहे. त्यामुळे येथून जाताना, चहाच्या मळ्यांसोबतच तांदळाची शेती पाहण्याचा अनुभव मिळतो. 4 / 11मसूरी शहराचं सौंदर्यामागेही एक ऐतिहासिक गोष्ट आहे. अठराव्या शतकामध्ये ब्रिटिश मिलिट्रीच्या अधिकाऱ्याने आपल्या एका सहकाऱ्यासह या जागेचा शोध लावला होता. त्यांनी सुट्टी आणि एकांतासाठी या जागेची निवड केली आणि तिथेच राहणं पसंत केलं. येथे मिळणाऱ्या मंसूरच्या झाडामुळे या ठिकाणाला मसूरी हे नाव देण्यात आलं. 5 / 11मसूरीमध्ये जाण्यासाठी मालरोजपासून एन्ट्री करावी लागते. आजही मालरोज रोड जुन्या काळातील बाजारपेठांच्या आठवण करून देतो. 6 / 11मसूरी ट्रेकिंगसाठीही उत्तम डेस्टिनेशन आहे. स्वातंत्र्यापूर्वी येथील एका डोंगरावर असणाऱ्या तोफेतून दररोज दुपारी एक गोळी झाडण्यात येत असे, त्यामुळे लोकांना वेळेबाबत समजण्यास मदत होते. त्यावरून याचं नाव 'गन हिल' असं ठेवण्यात आलं. ही मसूरीमधील दुसरा सर्वात उंच डोंगर आहे. जिथे तुम्ही ट्रेकिंगचा आनंद घेऊ शकता. या डोंगरांवरून तुम्ही हिमालयाच्या पर्वत रांगांच विहिंगमय दृश्य डोळ्यांमध्ये साठवू शकता. 7 / 11तुम्ही मसूरीमध्ये पायी चालणं किंवा घोडस्वारी करू शकता. विशाल हिमालयामध्ये होणारा सूर्यास्त पाहणं म्हणजे अत्यंत सुखद अनुभव आहे. येथे असणारी कॅमल रॉक बसलेल्या एकाद्या उंटाप्रमाणे दिसते. 8 / 11मसूरीपासून 15 किलोमीटर अंतरावर 4500 फूट ऊंचावर सर्वात मोठा आणि सुंदर झरा वाहतो. जो चारही बाजूंनी डोंगरांनी वेढलेला आहे. 9 / 11येथे अनेक तिब्बती शाळा असून त्याच्यापैकी पहिली शाळा 1960मध्ये सुरू करण्यात आली होती. याशिवाय येथे भारतीय प्रशासकीय सेवांसाठी तयारी करण्याचं एकमेव प्रशिक्षण केंद्र 'लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी' आहे. 10 / 11येथे अनेक तिब्बती शाळा असून त्याच्यापैकी पहिली शाळा 1960मध्ये सुरू करण्यात आली होती. याशिवाय येथे भारतीय प्रशासकीय सेवांसाठी तयारी करण्याचं एकमेव प्रशिक्षण केंद्र 'लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी' आहे. 11 / 11येथे अनेक तिब्बती शाळा असून त्याच्यापैकी पहिली शाळा 1960मध्ये सुरू करण्यात आली होती. याशिवाय येथे भारतीय प्रशासकीय सेवांसाठी तयारी करण्याचं एकमेव प्रशिक्षण केंद्र 'लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी' आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications