jails in Netherlands turned into Luxurious hotels reason is shocking
'या' देशात कारागृहांच रुपांतर केलं जातंय आलिशान हॉटेल्समध्ये, कारण ऐकुन चक्रावुन जाल... By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2022 4:01 PM1 / 10जगभरात असे अनेक तुरुंग आहेत, जे मर्यादेपेक्षा जास्त भरलेले आहेत. असे अनेक देश आहेत जिथे गुन्हेगारी खूप जास्त आहे, त्यामुळे तुरुंगात कैद्यांची संख्या ठरलेल्या संख्येपेक्षा जास्त आहे. अमेरिका आणि भारताबरोबरच, लॅटिन अमेरिकन देशांच्या तुरुंग ओव्हरक्राउडेड असल्याचे सांगितले जाते. 2 / 10मात्र, नेदरलँड हा एक असा देश आहे, जिथे गुन्हेगार कमी-अधिक प्रमाणात संपले आहेत. गुन्हे नगण्य आहेत, त्यामुळे आता मोठ्या तुरुंगांचे कार्यालय किंवा हॉटेलमध्ये रूपांतर होत आहे.3 / 10नेदरलँडमध्ये गेल्या 10 वर्षांत सर्वात कमी गुन्हे घडले आहेत. गेल्या 8 वर्षांत गुन्हेगारीचे प्रमाण 25 टक्क्यांनी घसरले आहे. देशभरात पोलिस ठाणी कमी झाल्यामुळे हा दर कमी झाल्याचे काही लोकांचे म्हणणे आहे.4 / 10मोठमोठाले तुरुंग आता पूर्णपणे रिकामे झाले आहेत. त्यातील काहींचे आलिशान हॉटेलमध्ये रूपांतर करण्यात आले आहे, लोकांना हा बदल खूप आवडत आहे.5 / 10तुरुंगाच्या काही रिकाम्या इमारतींमध्ये पूर्वी सीरियन निर्वासितांनाही ठेवण्यात आले होते. अॅमस्टरडॅमच्या बाहेरील अशाच तुरुंगाचे द हेट आर्सिथिस नावाच्या हॉटेलमध्ये रूपांतर करण्यात आले.6 / 10यामध्ये आता ज्या खोल्यांमध्ये पाहुणे आरामात राहतात, त्या खोल्या एकेकाळी कैद्यांना राहण्यासाठी वापरल्या जात होत्या. मात्र, या इमारतीचा चेहरामोहरा असा बदलण्यात आला आहे, की येथे तरुंग होतं, असं सांगितलं तर कोणाला विश्वास बसणार नाही.7 / 10येथे पाहुण्यांसाठी चार सूट्स अपग्रेड करण्यात आले असून त्यांना लक्झरी लुक देण्यात आला आहे. The Jailor, The Lyar, The Director आणि The Judge अशी त्यांची नावे आहेत. 8 / 10या हॉटेलच्या प्रत्येक खोलीत वाय-फाय, फ्लॅट स्क्रीन टीव्ही आणि इतर सुविधा आहेत. हॉटेलमध्ये एक उत्तम रेस्टॉरंट देखील आहे. येथे पाहुण्यांसाठी फिटनेस सेंटर, सोना बाथची व्यवस्था करण्यात आली आहे.9 / 10हॉलंडमध्ये अशी हॉटेल्स आता अनेक ठिकाणी आहेत. एक काळ असा होता जेव्हा हॉलंडचे तुरुंग युरोपातील सर्वात मोठे होते, सोबतच गुन्हेगारी देखील सर्वात जास्त होती. परंतु, आता सर्वकाही बदलले आहे.10 / 10अशा हॉटेल्समध्ये आता पर्यटकांची गर्दी वाढते आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications