kargil drass unexplored travel destination know how to reach
'या' सुंदर ठिकाणांसाठी सुद्धा कारगिल आहे प्रसिद्ध! By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2023 4:09 PM1 / 5कारगिलचे नाव ऐकताच आपल्या मनात १९९९ सालच्या आठवणी ताज्या होतात. खरंतर, भारत-पाकिस्तान युद्धातून आपल्याला कारगिल माहीत आहे. बहुतेक लोक कारगिल वॉर मेमोरियल पाहण्यासाठी येतात, परंतु याशिवाय येथे पाहण्यासारखे बरेच काही आहे. 2 / 5उंच पर्वत, तलाव आणि हिमनद्यांचे सुंदर दृश्य तुमचे मन प्रसन्न करेल. युद्ध स्मारकाव्यतिरिक्त तुम्ही कारगिलच्या इतर सुंदर ठिकाणांच्या फेरफटका मारू शकता. येथील सुंदर दृश्ये पाहून आनंद वाटेल.3 / 5कारगिलपासून हाकेच्या अंतरावर सुरू व्हॅली आहे. हे डोंगरातून वाहणाऱ्या नदीचा आवाज आणि थंडगार वाऱ्याची झुळूक कोणालाही दिलासा देईल. तसेच, येथील मठ आणि सुंदर गावे पाहण्याची संधी मिळेल.4 / 5लेहपासून 127 किलोमीटर अंतरावर असलेले लामायुरू मठ हे येथील आकर्षणाचे मुख्य केंद्र आहे. काश्मिरी शैलीतील बौद्ध मूर्तींची उदाहरणे येथे पाहता येतील. या मठात वर्षातून दोनदा मुखवटा नृत्य महोत्सवाचे आयोजन केले जाते, ते पाहण्यासाठी लोक लांबून येतात.5 / 5द्रासपासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर मिनामार्ग नावाचे एक सुंदर ठिकाण आहे. आकाशात तरंगणारे ढग आणि पर्वतांचे सुंदर नजारे तुम्हाला भुरळ घालतील. ही व्हॅली मचोई ग्लेशियरने वेढलेली आहे. निसर्गप्रेमींना हे ठिकाण खूप आवडणार आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications