शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Tourist Destinations : 'या' प्रदेशात आहे भारताचे 'स्वित्झर्लंड', सर्वच पर्यटकांना सौंदर्याचे आकर्षण!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2023 2:08 PM

1 / 6
विदेशात फिरण्याची भारतीय पर्यटकांची क्रेझ वाढत आहे. मात्र, विदेशी दौऱ्यांवर लाखो रुपये खर्च होत असल्याने हे स्वप्न पूर्ण करणे प्रत्येकालाच जमत नाही. पण तुमची इच्छा असेल तर भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत, जी आपल्या नैसर्गिक सौंदर्यात इतर देशांनाही मागे टाकतात.
2 / 6
हिमाचल प्रदेशातील खज्जियारचे सौंदर्य केवळ भारतीयच नाही तर परदेशी पर्यटकांनाही आकर्षित करते. येथील कुरणांचे सौंदर्य कोणालाही भुरळ घालू शकते. हिरवेगार दृष्य, डोंगरावरचे ढग आणि निळे आकाश हे ठिकाण खूप खास बनवते.
3 / 6
खज्जियार हे चंबा जिल्ह्यात स्थित आहे. समुद्रसपाटीपासून 1900 मीटर उंचीवर आहे. येथील इतिहास अतिशय प्राचीन मानला जातो. 10 व्या शतकात बांधल्या गेलेल्या खज्जी नागा मंदिराच्या नावावरून या जागेला हे नाव देण्यात आल्याचे सांगितले जाते.
4 / 6
खज्जियारमध्ये तुम्ही पॅराग्लायडिंग आणि ट्रेकिंगचा आनंद घेऊ शकता. येथे तुम्ही कैलास पर्वताची काही दृश्ये देखील पाहू शकता. येथील कलातोप वन्यजीव अभयारण्य देखील पाहण्यासारखे आहे. अनेक प्रकारचे प्राणी आणि पक्षी येथे पाहायला मिळतात. खज्जियारजवळ भगवान शंकराची 85 फूट मूर्ती आहे.
5 / 6
जर तुम्ही खज्जियारला गेलात तर तुम्ही डलहौजीसाठी देखील वेळ काढू शकता, जे येथून फक्त 24 किलोमीटर अंतरावर आहे. खज्जियारपासून सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन पठाणकोट आहे, जे सुमारे 95 किलोमीटर अंतरावर आहे. दिल्लीसह देशातील इतर अनेक शहरांमधून येथे ट्रेन धावतात.
6 / 6
पठाणकोट रेल्वे स्थानकावरून तुम्हाला खज्जियारसाठी टॅक्सी मिळेल. गग्गल विमानतळ हे सर्वात जवळचे विमानतळ आहे, जे 130 किलोमीटर अंतरावर आहे. चंदीगड, दिल्ली, कुल्लू फ्लाइट्स येथून चालतात. इथे रस्त्याने यायचे असेल तर खज्जियार हिमाचलमधील सर्व प्रमुख शहरांशी जोडलेले आहे. शिमला, चंबा, डलहौसी येथून नियमित बसेस आहेत.
टॅग्स :Himachal Pradeshहिमाचल प्रदेशTravel Tipsट्रॅव्हल टिप्स